विमानात घाबरली महिला म्हणून अचानक उघडला 'इमरजन्सी डोअर', पाहा Viral Video

विमानात घाबरली महिला म्हणून अचानक उघडला 'इमरजन्सी डोअर', पाहा Viral Video

महिलेच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती कोणाचंच ऐकली नाही आणि तिने दार उघडलं.

  • Share this:

चीनमध्ये एका महिलेने विमानात असं काही केलं की जे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. विमानात बसताना तिला घाबरल्यासारखे वाटतं होते. तरीही ती विमानात बसली. मात्र थोड्यावेळाने तिला श्वास घेण्यास त्रास झाल्यासारखं वाटू लागलं म्हणून तिने ताजी हवा मिळावी म्हणून बोर्डिंगच्याआधी चक्क इमरजन्सी डोअर उघडलं. तिने असं करताच विमानातील इतर प्रवासी घाबरले आणि त्यांनी लगेच केबिन क्रूला बोलावून घेतले.

सोमवारी चीनच्या वुहान येथून लेन्जहोउ (Wuhan to Lanzhou) शहराकडे जाणाऱ्या जियामेन एयरलाइन्समध्ये (Xiamen Airlines) ही घटना घडली. मिररने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सीटवर बसल्यानंतर लगेच महिलेला अस्वस्थ वाटू लागलं आणि मोकळी हवा मिळावी म्हणून तिने 'इमरजन्सी डोअर' उघडलं.

महिलेच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती कोणाचंच ऐकली नाही आणि तिने दार उघडलं. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

केबिन क्रूने यासंदर्भात पोलिसांना कळवले. The Sun ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी महिलेला विमानातून तातडीने उतरवले आणि पोलीस ठाण्यात घेऊन गेले. महिलेच्या या कृतीमुळे विमानाला निश्चित स्थळी पोहोचायला एक तास उशीर झाला.

Congo Fever: या आजाराने झाला होता तिघांचा मृत्यू, जाणून घ्या याची लक्षणं

थायरॉइडमध्ये या गोष्टी चुकूनही करू नका, होईल न भरून येणारं नुकसान

Vastushastra: पती- पत्नीमध्ये हवा असेल 'हाय रोमान्स' तर हे वास्तुदोष आजच करा दूर

महिला पोलीस ऑफिसरने केलेलं टक्कल पाहून अनुष्का शर्मा झाली चाहती, जाणून घ्या कारण

VIDEO: शरद पवार ईडी कार्यालयात जाण्याआधी जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

Published by: Madhura Nerurkar
First published: September 27, 2019, 1:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading