सावधान! कोरोनापेक्षाही घातक असा अज्ञात आजार पसरतोय; चीनने केलं अलर्ट

सावधान! कोरोनापेक्षाही घातक असा अज्ञात आजार पसरतोय; चीनने केलं अलर्ट

कझाकस्तानमध्ये (Kazakhstan) अज्ञात न्युमोनिया (unknown pneumonia) पसरत असल्याचं चीनच्या दूतावासानं सांगितलं.

  • Share this:

नूर सुल्तान, 10 जुलै : संपूर्ण जग अजूनही कोरोनाव्हायरसशी (coronavirus) लढा देतं आहे, अशात आता आणखी एका अज्ञान घातक आजारानं हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. हा आजार कोरोनाव्हायरसपेक्षाही धोकादायक आणि जीवघेणा असल्याचं सांगितलं जातं आहे. कझाकस्तानमध्ये (Kazakhstan) या आजाराचा केंद्रबिंदू असल्याचं सांगत चीनने याबाबत अलर्ट केलं आहे.

कझाकस्तानमधील चीनच्या दूतावासाने WeChat वर जारी केलेल्या अलर्टनुसार कझाकस्तानमध्ये अज्ञात न्युमोनिया (unknown pneumonia) पसरत आहे. या आजारामुळे होणारा मृत्यूदर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदरापेक्षाही जास्त आहे. रॉयटर्सने याबाबत वृत्त जिलं आहे. चीनने कझाकस्तानमधील आपल्या नागरिकांना आणि चीनमधील नागरिकांनाही जागरूक केलं आहे.

चीनच्या दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात न्युमोनियामुळे यावर्षी सहा महिन्यात 1772 लोकांचा मृत्यू झाला आहे. फक्त जूनमध्येच 628 लोकांचा बळी गेला. मृतांमध्ये चिनी नागरिकांचाही समावेश आहे. तर चीनी माडिया ग्लोबल टाइम्सने दूतावासाचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, या आजारामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या कोरोना रुग्णांपेक्षा जास्त आहे.

हे वाचा - सावधान! हवेतून पसरू शकतो कोरोना; WHO ने सांगितलं कसा कराल बचाव

दरम्यान हा व्हायरस कोरोनाशीसंबंधित आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.  कझाकिस्तान आरोग्य विभागासह अनेक संस्था या न्यूमोनियाच्या व्हायरसबाबत अभ्यास करत आहे.

कझाकिस्तानची सीमा चीनच्या उत्तर-पश्चिम भागातील शिनझिआंग उइगर प्रांताला लागून आहे. त्यामुळे हा आजार चीनमध्ये पसरण्यापासून रोखण्यासाठी काही प्रतिबंधात्मक पावलं उचलायचा हवीत असं चीनच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार जूनच्या मध्यापर्यंत कझाकिस्तानच्या तीन क्षेत्रात जवळपास 500 लोकांना न्यूमोनियाची लागण झाली. काझिनफॉर्मच्या वृत्तानुसार,  न्यूमोनियाग्रस्त रुग्णांची संख्या 2019 च्या तुलने दोन ते तीन पटीने अधिक आहे.

हे वाचा - गेल्या 48 तासांत 222 कोरोना योद्ध्यांना संसर्ग; 3 पोलिसांनी गमावला जीव

कझाकिस्तानमध्ये कोरोनाची 50,000 पेक्षा जास्त प्रकरणं आहेत. त्यापैकी 264 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेसह कित्येक देश चीनला कोरोनाव्हायरसच्या उद्रेकाबाबतची माहिती लपवण्याची जबाबदार धरत आलं आहे. तर चीनने सातत्याने हे नाकारलं. अमेरिका लोकांचं लक्ष भरकवटत असल्याचा आरोप चीनने केला.

Published by: Priya Lad
First published: July 10, 2020, 4:46 PM IST

ताज्या बातम्या