कस्टमरची रिक्वेस्ट म्हणून तिच्या Ex बॉयफ्रेंडच्या चेहऱ्यावर फेकला चहा, डिलिव्हरी बॉयचा VIDEO VIRAL

कस्टमरची रिक्वेस्ट म्हणून तिच्या Ex बॉयफ्रेंडच्या चेहऱ्यावर फेकला चहा, डिलिव्हरी बॉयचा VIDEO VIRAL

ब्रेकअप झालेल्या एका महिलेनं आपल्या एक्स-बॉयफ्रेंडवर राग व्यक्त करण्यासाठी एक वेगळीच पद्धत वापरली. डिलिव्हरी बॉयने आपल्या कस्टमरची विनंती शीरोधार्य मानून अगदी तसंच केलं. काय वाटतं VIDEO बद्दल?

  • Share this:

शांगडोंग (चीन), 13 फेब्रुवारी :  फेब्रुवारी म्हणजे प्रेम आणि रोमान्सचा महिना. या महिन्यामध्ये (Valentine's Day) तरुणाईचे गुलाबी दिवस सुरू होतात. तरुण-तरुणी या महिन्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपलं प्रेम व्यक्त करतात. 7 ते 14 फेब्रुवारी या आठ दिवसांच्या कालावधीमध्ये प्रेम व्यक्त करण्यासाठी कसं नियोजन  करायचं , यामध्ये सगळी जण व्यग्र असतात. पण अशामध्ये ज्यांचा ब्रेकअप झालाय त्यांच्यासाठी हा कालावधी खूप कठीण असतो. अशामध्ये चीनमध्ये ब्रेकअप झालेल्या एका महिलेनं  आपल्या एक्स-बॉयफ्रेंडवर राग व्यक्त करण्यासाठी एक वेगळीच पद्धत वापरली आहे याची सध्या जोरदार चर्चा होतेय.

चीनच्या शांगडोंग येथे राहणाऱ्या एका महिलेनं ब्रेकअप झाल्यामुळ आपल्या एक्स-बॉयफ्रेंडवर आगळ्या वेगळ्या पद्धतीने राग व्यक्त केलाय. या महिलेनं आपल्या एक्स- बॉयफ्रेंडसाठी चहाची ऑर्डर दिली खरी पण त्यामागे तिचा उद्देश वेगळाच होता. या महिलेनं डिलिव्हरी बॉयला आपल्या बॉयफ्रेंडकडे चहा पोहचवून त्याच्या तोंडावर फेकण्यास सांगतिलं . तिनं  डिलिव्हरी बॉयला विनंती करताना सांगितलं की, 'त्याच्यासोबत चांगलं वागण्याची काही गरज नाही. फक्त हा चहा जाऊन त्याच्या चेहऱ्यावर फेकून दे.'

आश्चर्याची गोष्ट म्हणजे डिलिव्हरी बॉयने महिलेनं केलेली विनंती मान्य केली आणि तिनं सांगितल्याप्रमाणं तिच्या बॉयफ्रेंडच्या चेहऱ्यावर चहा फेकला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. या व्हिडिओमध्ये डिलिव्हरी बॉय महिलेच्या एक्स-बॉयफ्रेंडच्या चेहऱ्यावर चहा फेकताना दिसत आहे. हा प्रकार पाहून महिलेच्या बॉयफ्रेंडला धक्का बसतो. अशामध्ये गोंधळलेल्या महिलेच्या बॉयफ्रेंडला डिलिव्हरी बॉय ऑर्डरची पावती दाखवतो आणि सूचनांकडे निर्देश करतो. त्याठिकाणावरुन पळ काढण्यापूर्वी डिलिव्हरी बॉय महिलेच्या एक्स-बॉयफ्रेंडची माफी सुद्धा मागताना दिसत आहे.

ओरिएंटल डेलीने दिलेल्या वृत्तानुसार, डिलिव्हरी बॉय काम करत असलेल्या टेकवे सर्व्हिसने चीनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं  की, 'या घटनेची चौकशी केली जात आहे. जर अवास्तव ऑर्डर मिळाली तर डिलिव्हरी स्टाफ युजर्सशी संवाद साधू शकतात आणि ऑर्डर नाकारु शकतात.'

पाहा - 'Relationship on Track' व्हेलेंटाइन डे निमित्त PHOTO व्हायरल, तुम्ही काय म्हणाल?

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर काही नेटिझन्सनी डिलिव्हरी बॉयने महिलेची विनंती मान्य केल्याबद्दल टीका केली आहे. तर काहींनी असे मत  'डिलिव्हरी बॉयने ग्राहकांच्या तक्रारी घेतल्या नाही पाहिजे.', असे मत व्यक्त केलं . तर काही युजर्सचं  असे म्हणनं  आहे की, 'ग्राहकाची धाडसी विनंती स्वीकारल्याबद्दल डिलिव्हरी बॉयला ५ स्टार रेटिंग दिलं पाहिजे.'

Published by: Aiman Desai
First published: February 13, 2021, 7:42 PM IST

ताज्या बातम्या