कुटुंबातील 11 लोकांनी एकमेकांशीच केलं 23 वेळा लग्न, नंतर घेतला घटस्फोट; जाणून घ्या कारण

कुटुंबातील 11 लोकांनी एकमेकांशीच केलं 23 वेळा लग्न, नंतर घेतला घटस्फोट; जाणून घ्या कारण

पैनने जमिनीच्या हव्यासापायी सख्खी बहीण, मेहुणीशी लग्न केलं. याचदरम्यान पैनच्या वडिलांनी इतर नातेवाईकांशी लग्न केलं.

  • Share this:

चीनमधील सरकारी योजना मिळवण्यासाठी एका कुटुंबाने असं काही केलं की जे वाचून हैराण व्हाल. चीनमधील एका कुटुंबातील 11 लोकांनी दोन आठवड्यात एकमेकांमध्येच 23 वेळा लग्न केलं आणि घटस्फोटही घेतला. CNN ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, हा घोटाळा तेव्हा सुरू झाला जेव्हा पैन नावाच्या एका व्यक्तिला झेजियांग प्रांतातील लिशुई शहरातील एका छोट्या गावात शहरी नूतनीकरण भरपाई योजनेबद्दल कळले.

People's Daily च्या रिपोर्टनुसार, स्थानिक नागरिकांना कमीत कमी 430 फूटचं अपार्टमेन्ट देण्याची सुविधा करण्यात आली होती. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनाही ही घरं मिळणार होती. पैनने या सरकारी योजनेचा फायदा घेण्यासाठी पूर्व पत्नीशी दुसऱ्यांदा लग्न केलं. अवघ्या सहा दिवसात पैनला जमीन मिळाली. जमीन मिळाल्यानंतर त्याने पूर्व पत्नीला पुन्हा घटस्फोट दिला. यानंतर याच कुटुंबातील इतर सदस्यही या घोटाळ्यात सामील झाले.

पैनने जमिनीच्या हव्यासापायी सख्खी बहीण, मेहुणीशी लग्न केलं. याचदरम्यान पैनच्या वडिलांनी इतर नातेवाईकांशी लग्न केलं. या लग्न घोटाळ्यात त्याची आईही सामिल होती. एकमेकांशी लग्न केल्यानंतर त्यांनी गावातील नागरिक म्हणून नोंदणी केली आणि नंतर घटस्फोट घेतला.

रिपोर्टनुसार, पैनने एका आठवड्यात तीनदा लग्न केलं आणि लग्नाची नोंदणी केली. दरम्यान, सरकारी अधिकाऱ्यांना पैनच्या या घोटाळ्याबद्दल कळलं. शोध घेतल्यावर त्यांना दिसलं की, 11 लोकांच्या घरचा पत्ता एकच आहे. घोटाळ्याचाा खुलासा झाल्यानंतर सर्वांना अटक करण्यात आली. People's Daily च्या रिपोर्टनुसार, चौघांना अटक करण्यात आली असून इतर सदस्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

विमानात घाबरली महिला म्हणून अचानक उघडला 'इमरजन्सी डोअर', पाहा Viral Video

थायरॉइडमध्ये या गोष्टी चुकूनही करू नका, होईल न भरून येणारं नुकसान

Vastushastra: पती- पत्नीमध्ये हवा असेल 'हाय रोमान्स' तर हे वास्तुदोष आजच करा दूर

महिला पोलीस ऑफिसरने केलेलं टक्कल पाहून अनुष्का शर्मा झाली चाहती, जाणून घ्या कारण

VIDEO: शरद पवार ईडी कार्यालयात जाण्याआधी जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Sep 27, 2019 04:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading