मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /हातानेच नाकावरील पिंपल फोडणं जीवाशी; तरुणीच्या मेंदूत झालं गंभीर इन्फेक्शन

हातानेच नाकावरील पिंपल फोडणं जीवाशी; तरुणीच्या मेंदूत झालं गंभीर इन्फेक्शन

तुम्हीदेखील हातानेच पिंपल फोडत (popping pimple with hand) असाल तर आधी ही बातमी वाचा.

तुम्हीदेखील हातानेच पिंपल फोडत (popping pimple with hand) असाल तर आधी ही बातमी वाचा.

तुम्हीदेखील हातानेच पिंपल फोडत (popping pimple with hand) असाल तर आधी ही बातमी वाचा.

बीजिंग, 09 सप्टेंबर : चेहऱ्यावर कुठे पिंपल दिसला की बहुतेकांना ती हातानेच फोडायची सवय असते. तुम्हीदेखील असंच करत असाल सावध व्हा! ही बातमी आधी वाचा. नाकावरील एक पिंपल हाताने फोडणं एका तरुणीला चांगलं महागात पडलं आहे किंबहुना ते तिच्या जीवावर बेतण्याची वेळ आली आहे. नाकावरील पिंपल हाताने फोडल्यानंतर तिच्या मेंदूत गंभीर असं इन्फेक्शन झालं आहे. ज्यामुळे तिचा जीवही जाऊ शकतो.

चीनच्या (China) झेजियांग प्रांताच्या  (Chinese province Zhejiang) निंघई शहरात राहणारी  यांग. 19 वर्षांची ही तरुणी. तरुण वयात पदार्पण करताना सर्वसामान्यपणे तिच्याही चेहऱ्यावर पिंपल येऊ लागले. तिच्या नाकावर फक्त एक पिंपल आला होता. चेहऱ्यावरील पिंपल म्हणजे सौंदर्यात बाधा असं या वयात वाटतंच. त्यामुळे पिंपल दिसताच ते घालवण्यासाठी कुणीही प्रयत्न करेल, तसाच प्रयत्न यांगनेदेखील केला. तिने हातानेच नाकावरील पिंपल फोडलं मात्र तिने कल्पनाही केली नसेल असं तिच्यासह घडलं.

डेली मेलच्या वृत्तानुसार, तरुणीच्या नाकावर फक्त एकच पिंपल होता. ज्याला कंटाळून तिने तो हातानेच फोडला. पिंपल फोडताच क्षणी तिच्या डोळ्यांखाली वेदना होऊ लागल्या, डोळ्यांना सूज आली, चेहऱ्याच्या एका बाजूची त्वचा लाल झाली. त्यानंतर तिला तापही आला. तरुणीला झेजियांग पब्लिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे तिची तपासणी केली असता. तिला मेंदूचं गंभीर असं इन्फेक्शन झाल्याचं समजलं.

हे वाचा - अरे देवा! खाजवता खाजवता गुप्तांगात घुसला बिअरचा ग्लास

डॉक्टरांनी सांगितलं, नाकाच्या ज्या टोकावर पिंपल झालं होतं, ज्याला ट्रायंगल ऑफ डेथही म्हणतात. तिथून दोन्ही बाजूच्या गालाच्या सुरुवातीच्या भागापर्यंत महत्त्वपूर्ण पेशी असतात. या भागाला हानी पोहोचल्यास संक्रमण मेंदूपर्यंत पोहोचतं. याला cavernous sinus thrombosis असं म्हटलं जातं. यामध्ये मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या होत्या ज्या तिच्या डोळ्यांच्या मागील भागात होत्या. हळूहळू हे संक्रमण नाक, कान आणि दातांच्या प्रणालीवर पसरलं. अशा परिस्थितीत ती व्यक्ती जगणं म्हणजे अशक्यच. 3 पैकी एका रुग्णाचा मृत्यू होतो.

हे वाचा - वाघालाही घाबरला नाही बैल; गायीचे लचके तोडताना शेजारीच होता उभा, पाहा VIDEO

दरम्यान यांगची प्रकृतीही गंभीर असल्याचं सांगितलं जातं आहे. रुग्णालयाच्या न्यूरोलॉजी विभागाचे डॉक्टर हान कुन यांनी सांगितलं, या मुलीमध्ये मेनिंजाइटिसची लक्षणं दिसून येत आहेत. लक्षणं आणखी गंभीर झाली तर तिला वाचवणं कठीण होईल.

First published:
top videos

    Tags: Health, Lifestyle, Pimples