मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /6 वर्षे रुग्णालयात राहिला रुग्ण, बिलाऐवजी हॉस्पिटलनंच दिले 53 लाख; नेमकं काय आहे प्रकरण वाचा

6 वर्षे रुग्णालयात राहिला रुग्ण, बिलाऐवजी हॉस्पिटलनंच दिले 53 लाख; नेमकं काय आहे प्रकरण वाचा

रुग्णालयातील रूमलाच त्यानं आपलं घर बनवलं आणि कुटुंबासह तिथं राहू लागला.

रुग्णालयातील रूमलाच त्यानं आपलं घर बनवलं आणि कुटुंबासह तिथं राहू लागला.

रुग्णालयातील रूमलाच त्यानं आपलं घर बनवलं आणि कुटुंबासह तिथं राहू लागला.

बीजिंग, 06 जानेवारी : रुग्णालयात (Hospital) रुग्ण जितके दिवस राहतो, त्याच्यावर जसे उपचार होतात त्यानुसार रुग्णालय त्याचं बिल देतं. रुग्णाला डिस्चार्ज देताना रुग्णाला किंवा त्यांच्या नातेवाईकांना बिल भरावं लागतं. मात्र चीनमध्ये (China) एक वेगळंच प्रकरण समोर आलं जिथं एक दोन नव्हे तर तब्बल सहा वर्षे रुग्ण एकटा नव्हे तर आपल्या कुटुंबासह रुग्णालयात राहिला. पण रुग्णालयातून जाताना रुग्णालयाला बिल देणं तर दूरच उलट रुग्णालय प्रशासनानंच तब्बल 53 लाख रुपये दिले आहेत.

चीनमधील टियान नावाची व्यक्ती 2014 साली रुग्णालयात दाखल झाली. त्या व्यक्तीला चक्कर येत होती, उलटी होत होती. किरकोळ आजार असल्यानं काही दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या व्यक्तीला डिस्चार्जही देण्यात आला मात्र बिलावरून रुग्णालय प्रशासन आणि रुग्णामध्ये वाद झाला. रुग्णालयानं बिल न भरता रुग्णाला हॉस्पिटलबाहेर जाऊ दिलं नाही. त्यानंतर हा रुग्ण रुग्णालयातच ठाण मांडून बसला.

हे वाचा - हार्टबाबत शिकवता शिकवता शिक्षिकेनं हृदयालाच हात घातला ना राव! VIDEO VIRAL

रुग्णालयाने आपल्यावर चुकीचे उपचार केले असा आरोप त्यानं लावला आणि आपण रुग्णालयातून जाणारच नाही असं सांगितलं.  रुग्णालयात ज्या रममध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते ती रूम रिकामी करण्यास नकार दिली. इतकंच नव्हे तर त्या व्यक्तीची आई-वडीलही तिथंच येऊन राहू लागले. त्याच रूमला त्यानं आपलं घर बनवलं. घरात जे काही सामान गरजेचं असंत ते सर्व तिथं घेऊन आला.

हे वाचा - भारीच! स्मार्टकार्डची गरज नाही; फक्त रिकामी कॅन टाकून मशीनमधून मिळतात पैसे

रुग्णालय प्रशासनानं त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण काहीच फायदा झाला नाही. रुग्णालयातनं कोर्टात धाव घेतली. कोर्टात रुग्णालयानं सांगितलं, टियान बेड सोडेल तेव्हाच गरजू रुग्णांना उपबल्ध होईल. टियाननं रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप केला.

कोर्टानं अखेर 6 वर्षांनंतर टियान आणि त्याच्या कुटुंबाला रुग्णालयातील ती रूम रिकामी करावी लागली. पण रुग्णालयालाही मोठा फटका बसला. त्या रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबाला  तब्बल 73 हजार डॉलर म्हणजे जवळपास 53,36,756 रुपये देण्याचे आदेश कोर्टानं दिले. रुग्णालयानं उपचारात हलगर्जीपणा केल्याचा टियानचा आरोप कोर्टानं मान्य केला आणि त्याचीच भरपाई रुग्णालयाला द्यायला सांगितला.

First published:

Tags: China, Private hospitals, World news