Home /News /lifestyle /

अरे देवा! कोरोना व्हायरसबाबत चीनमधून आली नवी बातमी; उडाली खळबळ

अरे देवा! कोरोना व्हायरसबाबत चीनमधून आली नवी बातमी; उडाली खळबळ

चीनमधील या नव्या बातमीनं आता सर्वांचीच झोप उडवली आहे.

    बीजिंग, 04 जानेवारी : संपूर्ण जगात कोरोनाव्हायरस (coronavirus) थैमान घालतो आहे. त्यात कोरोनाव्हायरसच्या नव्या रूपाचं (corona new strain) संकट ओढावलं आहे. आता ज्या चीनमध्ये (china) कोरोनाव्हायरसचा सर्वात आधी उद्रेक झाला तिथून आता खळबळजनक अशी बातमी येते आहे. चीनमध्ये ऑटो पार्ट्समध्येही (auto parts) कोरोनाव्हायरस सापडला आहे. त्यामुळे सर्वांची झोप उडाली आहे. चीनमध्ये ऑटो पार्ट कंपनीतील काही पॅकेजिंग सॅम्पल घेण्यात आले. यापैकी बहुतेक पॅकेज कोरोना संक्रमित असल्याचं दिसून आलं आहे. हे ऑटो पार्ट पॅकेजिंग सॅम्पल देशातील वेगवेगळ्या भागातून घेण्यात आले होते. चीनमधील कोव्हिड 19 नियंत्रण कार्यालयाच्या माहितीनुसार शनिवारी उत्तर चीनच्या शांक्सी प्रांतातील जिनचेंग शहरात रोग नियंत्रण विभागानं ऑटो टायर पॅकेजिंगवर व्हायरस असल्याचं शोधून काढलं आहे. हे वाचा - कोरोना लशीनं नपुंसकत्व येतं? अफवांना बळी पडू नका, DCGI ने दिली 101 टक्के खात्री स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की ऑटो पार्ट पॅकेजिंगचे नमुने घेण्यात आले होते. त्यातील तीन इतर पॉझिटिव्ह नमुने हुबेई प्रांतातील कंगझू शहरात आणि शेडोंग प्रांतातील यांताई आणि लिनीमध्ये आढळून आले आहेत. या ऑटो पार्ट्सची विक्री करणाऱ्या बीजिंगमधील एका कंपनीच्या कर्मचाऱ्याला कोरोना झाला होता. ती व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यानंतर चीनच्या विविध शहरातील संबंधित ऑटो पार्ट्स आणि कर्मचाऱ्यांची न्यूक्लिक अॅसिड टेस्ट करण्यात आली. काही ऑटो पार्ट्समध्ये तर डिसेंबरच्या अखेर व्हायरस असल्याचं स्पष्ट झालं आहे. हे वाचा - मोदी सरकारसाठी 200 रु.; सर्वसामान्यांना किती किमतीत उपलब्ध होणार कोरोना लस पाहा आज तकच्या वृत्तानुसार पॅकेजवर व्हायरस सापडताच तात्काळ हालचाली सुरू करण्यात आल्या. या सामानाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना वेगळं करण्यात आलं. वेगळे केलेले कर्मचारी वगळता इतर सर्वांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याचं सांगितलं जातं आहे. ज्या ठिकाणी सामान ठेवण्यात आलं आहे, ती संपूर्ण जागा सील करण्यात आली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या