...म्हणून या देशात ख्रिसमस सेलिब्रेट करण्यावर कडक बंदी

नाताळ हा सण पाश्चिमात्यकरणाला प्रोत्साहन देणारा आहे. या सणाचा तरुणांवर वाईट परिणाम होतो.

  • Share this:

एकीकडे जगभरात नाताळचे हे दिवस मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. तर दुसरीकडे उत्तर चीनमधील एका शहरात नाताळबद्दल दिल्या जाणाऱ्या सेलवर तसेच सजावटीवर बंदी घालण्यात आली आहे.

हा निर्णय शहरात होणाऱ्या एका पुरस्कार सोहळ्याच्या सफाईसाठी घेण्यात आला आहे. लँगफँगच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, नाताळचा सण डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला नाही.

चीन देशाकडे नास्तिक देश म्हणूनच पाहिले जाते. चीनमधील सरकारला नागरिकांनी हा सण साजरा करु नये असं वाटतं. यासाठीच त्यांनी लोकांना सजावट करण्यापासून रोखले आहे.

चीन देशाच्या मते, नाताळ हा सण पाश्चिमात्यकरणाला प्रोत्साहन देणारा आहे. या सणाचा तरुणांवर वाईट परिणाम होतो. चीनमध्ये मान्यता प्राप्त ५ धर्मांमध्ये ख्रिश्चन धर्मही एक आहे.

याबद्दल बोलताना चीनच्या प्रसारमाध्यमांनी सांगितले की, उत्तर चीनमधील हेबेई प्रांतातील लँगफँगच्या शहरी प्रशासनाने रविवारी एक नोटीस जारी केली. यात स्पष्टपणे लिहिले होते की, रस्त्यावरील ख्रिसमसच्या झाडावर प्रतिबंध लावण्यात आले आहे.

तसेच दुकानदारांनी ख्रिसमसच्या गोष्टी विकण्यासाठी पोस्टर, बॅनर तसेच लाइट बॉक्सचा वापर करायचा नाही. सुट्ट्यांचा आनंद किंवा अधिक विक्रीसाठी आऊटडोअर प्रदर्शनावरही बंधनं घालण्यात आली आहेत.

ग्लोबल टाइम्सच्या मते, शहरातील दुकानदारांना नाताळशी निगडीत सामान जसं ख्रिसमस ट्री, सँटाचा ड्रेस, सॉक्स किंवा इतर सजावटीच्या वस्तु विकण्याला मनाई केली आहे.

नोटीसमध्ये हे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की,  सर्व ब्युरो कर्मचाऱ्यांना ख्रिसमस थीमच्या प्रचाराचं निरीक्षण करण्यासाठी २३ डिसेंबरपासून ख्रिसमच्या दिवसापर्यंत हजर राहण्यास सांगितले आहे.

सरकारने ऑनलाइनही नोटीस पाठवली. या नोटीसमध्ये लिहिले की, नाताळच्या दिवशी पार्कमध्ये तसेच सार्वजनिक स्थळांवर धार्मिक गोष्टी काही घडत तर नाहीत ना याकडे अधिकाऱ्यांना लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे.

एका ब्युरो अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ग्लोबल टाइम्सला सोमवारी सांगितले की, नाताळला लक्ष करुन या सर्व गोष्टी करण्यात आल्या नसून राष्ट्रीय सभ्य शहरांच्या वार्षिक रेटिंगसाठी ही बंदी घालण्यात आली आहे.

कर्मचाऱ्याने पुढे सांगितले की, रस्त्यानजिक लावण्यात येणारी दुकानं आणि विक्रेत्यांवर लगाम लावणं आमचं नित्याचं काम आहे.

नाताळच्या दिवसांमध्ये अवैध्य गोष्टीही घडू शकतात. यामुळेच या काळात बंदी घालण्यात आली आहे.

गेल्या वर्षी चीनमधील शेनयांग या विद्यापीठाने परिसरात नाताळ समारंभावर बंदी घालण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2018 06:58 AM IST

ताज्या बातम्या