हा क्युटनेस नाही तर साइड इफेक्ट! क्रीम लावताच फुग्यासारखं फुगलं चिमुरड्याचं तोंड

हा क्युटनेस नाही तर साइड इफेक्ट! क्रीम लावताच फुग्यासारखं फुगलं चिमुरड्याचं तोंड

गुबगुबीत बाळ प्रत्येकाला आवडतं. पण या फोटोतील बाळ पाहून थोडा धक्काच बसेल.

  • Share this:

बीजिंग, 13 जानेवारी : लहान मूल (baby) म्हटलं की ते जितकं गुबगुबीत जितकं क्युट वाटतं. गोलू गोलू बाळ बहुतेकांना आवडतं. या फोटोतील बाळही तसंच गोलू आहे. पण जरा जास्तच. त्यचा चेहरा प्रमाणापेक्षा जास्तच फुगलेला आहे. या बाळाचा हा गुबगुबीतपणा किंवा क्युटनेस नाही. तर त्याला झालेला साइड इफेक्ट (side effect) आहे. हो... या चिमुरड्याला साइड इफेक्ट झाला आहे तो एका क्रीमचा (cream).

चीनमधील (China) या बाळाचा फोटो पाहून प्रत्येकजण थक्क झाला आहे.  बाळाची त्वचा चांगली राहावी यासाठी स्किन केअर प्रोडक्टचा वापर केला जातो. या बाळाच्या पालकांनीही तेच केलं.  हे बाळ ज्याचा चेहरा एखाद्या फुग्याप्रमाणे फुगला. इतकंच नव्हे तर त्याच्या चेहऱ्यावर केसही आल्याचं सांगितलं जातं आहे आणि याचं कारण म्हणजे त्याला लावलेलं क्रीम. या बाळाच्या आईनं त्याला असं क्रीम लावलं ज्याचा दुष्परिणाम असा झाला.

मिररच्या रिपोर्टनुसार या बाळाची त्वचा कोरडी झाली होती. त्यामुळे त्याची आई त्याला क्रीम लावत होती. त्यानंतर काही दिवसांनी बाळाच्या चेहऱ्यावर अशा पद्धतीनं सूज आली. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी बाळाच्या त्वचेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रोडक्टबाबत म्हणजे साबण-क्रीम याबाबत विचारलं. तेव्हा त्याच्या आईनं जवळपास दोन महिन्यांपासून बाळाला एक क्रीम लावत असल्याची माहिती दिली.

हे वाचा - अरे बापरे! 3114154015... महिन्याचं अब्जावधीचं Electricity bill; ग्राहकाला शॉक

कदाचित हा त्याचाच दुष्परिणाम तर नाही ना अशी शक्यता डॉक्टरांना वाटली. त्यामुळे त्यांनी त्या क्रीमची तपासणी केली आणि त्यानंतर मात्र डॉक्टरांनाही धक्का बसला. कारण ती क्रीम स्टेरॉईड क्रीम होती जी मोठ्या माणसांसाठी वापरली जाते. मोठ्या माणसांनादेखील ही क्रीम अगदी कमी प्रमाणात वापण्याचा सल्ला दिला जातो. मग लहान मुलांसाठी वापरण्याचा तर प्रश्नच येत नाही. असं असतानाही या बाळाच्या चेहऱ्यावर दोन महिने दररोज ती क्रीम लावण्यात आली. त्यामुळे त्याचा चेहरा सूजला.

बाळाचा चेहरा सूजण्याचं कारण समजताच डॉक्टरांनी तात्काळा ती क्रीम न वापरण्याचा सल्ला त्याच्या पालकांना दिला. क्रीम वापरणं थांबवल्यानंतर आता बाळाची प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं जातं आहे.

हे वाचा - गाव करील ते राव काय करील! 70 फूट दरीतून खेचून काढला ट्रक; 8 जणांना वाचवलं VIDEO

त्यामुळे काळजी घ्या. तुमच्या चिमुरड्यांच्या बाबतीत असा हलगर्जीपणा करू नका. त्यांच्यासाठी कोणतीही वस्तू वापरताना नीट तपासणी करून घ्या. गरज पडल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणंच जास्त फायदेशीर ठरेल.

Published by: Priya Lad
First published: January 14, 2021, 2:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading