अनेकदा आपण सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ पाहत असतो. ज्यातून आपल्याला काहीतरी अद्भुत पाहायला मिळतं. सध्या असाच एक अद्भुत व्हिडिओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक चिंपांझी व्यायाम करताना दिसत आहे. एरवी लोकांना व्यायाम करायचा म्हटलं की नको वाटतं. पण या व्हिडिओमधला चिंपाझी अत्यंत हुशार आहे. जो माणसाच्या प्रत्येक हालचालींची नकल करतो.
या व्हिडिओमध्ये चिंपांझी विचित् रप्रकारे व्यायाम करीत आहे, जे खूपच मनोरंजक आहे. हा व्हिडिओ एका प्राणी संग्राहालयातला आहे. या चिंपांझीची काळजी घेणारी महिला ज्याप्रकारे हालचाल करते. अगदी हुबेहूब कॉपी हा चिंपांझी करत आहे. ती महिला या चिंपांझीला व्यायाम शिकवत आहे.
या दोघांच्या मध्ये एक काचेची भिंत आहे, म्हणून ते एकमेकांना पाहू शकतात आणि सांकेतिक भाषेत संभाषणही करत आहेत. हा मजेदार व्हिडिओ सुसंता नंदा नावाच्या ट्विटर यूजरने ट्विटरवर शेअर केला आहे. हा मजेदार वाटत असला तरी या व्यक्तीनं खूप महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. या व्यक्तीनं कॅप्शन मध्ये म्हटलं की, ' हा व्हिडिओ शानदार आहे....पण या मुक्या प्राण्याला आपल्या मनोरंजनासाठी बंदिस्त ठेवणं गरजेचं आहे का? प्राण्यांना जंगलातच राहणं आवश्यक आहे.'
Amazing... But do they need to be in cages for our entertainment? Wild is where they belong pic.twitter.com/rCeGuKJEBU
— Susanta Nanda IFS (@susantananda3) January 6, 2021
अवघ्या दहा शेंकदाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. आता पर्यंत हा व्हिडिओ 17 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर जवळपास 2 हजार लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral video.