Home /News /lifestyle /

मूर्ती लहान पण कीर्ती महान; 13 व्या वर्षीच पठ्ठ्याने लिहिली चक्क कादंबरी

मूर्ती लहान पण कीर्ती महान; 13 व्या वर्षीच पठ्ठ्याने लिहिली चक्क कादंबरी

नैनितालमध्ये राहणाऱ्या एका 13 वर्ष वयाच्या विपुल जोशी (Vipul Joshi) याने चक्क एक कादंबरीच (Novel) लिहिली आहे.

    दिल्ली, 15 सप्टेंबर : आपल्याला लहान मुलांनी केलेले पराक्रम हे सतत आपल्या नातलगांकडून ऐकायला मिळत असतात. काही मैदानी खेळ, साहित्यिक विषयांच्या स्पर्धा (Competition for children) किंवा इतर काही खेळांमध्ये लहान मुलं हे नाव कमावतात. त्यावेळी नातलगांसह सर्वस्तरातून त्यांते कौतुकही केले जात असते. एवढ्या कमी वयात त्यांनी गाजवलेली कामगिरी खरंच उल्लेखनीय असते, त्यामुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत असतो. परंतु आता एका 13 वर्षीय लहान मुलाने एक मोठा पराक्रम करत समाजात एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. नैनितालमध्ये (Nainital) राहणाऱ्या 13 वर्षांच्या वयाच्या विपुल जोशी (Vipul Joshi) याने चक्क एक कादंबरीच (Novel) लिहिली आहे. त्यामुळे त्याचं फार कौतुक होत आहे. तो सध्या आठवीत असून नैनितालच्या सेंट जोसेफ स्कूल मध्ये शिक्षण घेत आहे. त्यामुळे त्याने केलेल्या या अनोख्या कामगिरीमुळे शाळेतील शिक्षकही प्रचंड खूश झाले असून आता लोकांनी ही कादंबरी वाचायला घेतली आहे. ही कादंबरी एका 19 वर्षीय मुलावर आधारित असून त्याचे नाव 'गॅरीज अॅडव्हेंचर द एलिक्झर ऑफ इम्मोरटालिटी' असे आहे. Engineer Life: 3 इडियट्ससारखं खरंच असतं का इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांच जगणं या कादंबरीत जादुई दुनिया, मैत्री, त्यातला धोका आणि साहस, धैर्य यावर आधारित काही उपकथानकं वाचायला मिळणार आहेत. विपुल जोशीने ही कादंबरी भारतात लागलेल्या लॉकडाउननंतर लिहिली होती. विपुल यांना कविता लिहायलाही फार आवडतं. त्याच्या काही आवडत्या आणि मोजक्या कविताही यात वाचायला मिळतील. त्यामुळे आता लोकांना त्याने लिहिलेली कादंबरी वाचायला आवडत असून ती वाचण्यासाठी लोक कादंबरी विकत घेत आहेत.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: School children, Uttarakhand

    पुढील बातम्या