अरेच्चा! कमालच झाली; अवघ्या 3 दिवसांचं नवजात बाळ झालं आठवी पास

अरेच्चा! कमालच झाली; अवघ्या 3 दिवसांचं नवजात बाळ झालं आठवी पास

जन्मानंतर तिसऱ्याच दिवशी आठवी पास झालेल्या या मुलाच्या पालकांनाही धक्का बसला आहे.

  • Share this:

पाटणा, 09 एप्रिल : तुम्ही आठवी पास कधी झालात? तेराव्या किंवा चौदाव्या वयात. बरोबर ना. पण एखादं बाळ (Baby) आठवी पास झाल्याचं कधी ऐकलं आहे का? तेसुद्धा जन्मानंतर तीन दिवसांतच. हो...अवघ्या तीन दिवसांचं नवजात बाळ आठवी पास (3 days baby passed class 8) झालं आहे. ज्याला अजून आईचं दूधही नीट ओढता येत नाही ते बाळ चक्क आठवी पास झालं असं सांगितलं तर कुणालाही आश्चर्य वाटणारच! पण ही कमाल नेमकी झाली तरी कशी? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना?

ही कमाल केली ती बिहारच्या मुझ्झफ्फरनगरमधील  (Muzaffarpur) एका शाळेने. मीनपूरमधील गोसाईदास तेनगारी शाळेतील (Gosaidas Tangari) हा आठवी पास असलेल्या अवघ्या 3 दिवसांचा विद्यार्थी. प्रिन्स असं त्याचं नाव. त्याच्या टीसी म्हणजेच ट्रान्सफर सर्टिफिकेटवर (Transfer Certificate) तो 23 मार्च 2007 रोजी आठवी पास झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तर याच सर्टिफिकेटवर त्याची जन्मतारीख 20 मार्च 2007 आहे. आपल्या मुलाचं हे शालेय प्रमाणपत्र पाहून तर त्याच्या पालकांनी धक्का बसला.

हे वाचा - SSC, HSC परीक्षेदरम्यान कोरोना झाला तर अशा विद्यार्थ्यांचं काय?

प्रिन्सने आठवी पास केली खरी पण तो प्रत्यक्षात तीन दिवसांचा नाही आहे. तर ही शाळा प्रशासनाकडून झालेली मोठी चूक आहे. ही चूक सुधारण्यासाठी मुलाचे पालक शाळेतही गेले. त्यांनी शाळेच्या मुख्याधापकांच्या निदर्शनास ही चूक आणून दिली. पण मुख्याध्यापकांनी त्यांना फटकारलं शिवाय चूक दुरूस्त करून देण्यासही नकार दिला, असं वृत्त झी न्यूजने दिलं आहे.

हे वाचा - खळबळजनक! आणखी एक रुग्णालय कोरोनाच्या विळख्यात; लस घेतलेले 35 डॉक्टर पॉझिटिव्ह

शाळेने केलेल्या चुकीमुळे आता मुलाच्या भविष्याची चिंता त्यांना सतावू लागली. त्यामुळे शेवटी या पालकांनी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यांनी हा बेजबाबदारपणा नाही तर लिहिण्यात झालेली चूक आहे असं सांगत ती लवकरच दुरूस्त केली जाईल असं आश्वान दिलं आहे.

Published by: Priya Lad
First published: April 9, 2021, 10:14 PM IST

ताज्या बातम्या