Home /News /lifestyle /

धक्कादायक! 'लपाछपी'चा खेळ चिमुकलीच्या जीवावर; मेंदूतून भळाभळा वाहू लागलं रक्त अखेर...

धक्कादायक! 'लपाछपी'चा खेळ चिमुकलीच्या जीवावर; मेंदूतून भळाभळा वाहू लागलं रक्त अखेर...

लपाछपी साधा खेळ वाटत असला तरी तो लहान मुलांसाठी भयंकर ठरू शकतो.

    मुंबई, 16 मे : तुम्ही तुमच्या लहानपणी लपंडाव किंवा लपाछपी खेळला असालच. आता कदाचित तुमची मुलंही हा खेळ खेळत असतील. अगदी साधासोपा खेळ ज्यात तशी इतर खेळांप्रमाणे मुलांना दुखापत होण्याची फार भीती नसते. असं आपल्याला वाटत असलं तरी हा खेळही जीवावर बेतू शकतो. असंच एक धक्कादायक प्रकरण सध्या समोर आलं आहे. लपाछपीमुळे एका चिमुकलीच्या मेंदूला इतकी गंभीर दुखापत झाली की तिची ब्रेन सर्जरी करावी लागली (Child injured while playing hide and seek). 3-4 वर्षांची रिल बेकन. लपाछपीचा खेळ खेळताना तिच्या मेंदूला मार लागला. ती जवळजवळ मृत्यूच्या दारातच पोहोचली होती. पण सुदैवाने तिचा जीव वाचला आहे. तिची ब्रेन सर्जरी करून तिला वाचवण्यात आलं आहे (Child brain injury while playing hide and seek). रिल आपल्या आई-वडिलांसोबत घरात लपंडाव म्हणजे लपाछपी खेळत होती. लपण्यासाठी ती ड्रेसिंग टेबलच्या मागे गेली. त्यानंतर पाहण्यासाठी म्हणून ती मागे वेगान वळली तोच टेबलला तिचं डोकं धाडकन आपटलं. तिला दुखापत झाली पण तरी ती काही सेकंदातच उठून लगेच खेळू लागली. ती जास्त लागल्यासारखी रिअॅक्ट झाली नाही त्यामुळे तिच्या पालकांनाही सर्वकाही सामान्य वाटलं. हे वाचा - आश्चर्य! एकाच वेळी प्रेग्नंट, डिलीव्हरीही एकाच दिवशी; जुळ्या बहिणींची मुलंही आता Same to Same कित्येक तास ती खेळली. पण त्यानंतर ती मोठमोठ्याने ओरडू लागली. तिने आपलं डोकं धऱलं आणि झोपण्यासाठी धडपडू लागली. तेव्हाही तिच्या पालकांना ती खेळात काहीतरी नाटक करत असावी असं वाटलं. पण जेव्हा ती टॉयलेटमध्ये गेली तेव्हा तिथं जमिनीवर कोसळली. तिचे हातपायही फुलले. तिला झोपायचं होतं पण झोपही लागत नव्हती.  तिची अवस्था पाहून तिचे आईवडील मिशेल आणि एमीही घाबरले. तिला घेऊन त्यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. तिथं वैद्यकीय तपासणीत तिच्या मेंदूतून रक्तस्राव होत असल्याचं निदान झालं. थोडा जरी उशीर झाला असता तरी तिच्या जीवावर बेतलं असतं.  तिला एपिड्यूरल हेमेटोमा होता, जे एक प्रकारचं ब्रेन ब्लीड आहे.  डॉक्टरांनी सांगितलं, जर ती झोपली असती तर उठू शकली नसती आणि असं झालं असतं तर तिचं ब्रेन डॅमेज झालं असतं. हे वाचा - 11 हजार वोल्टचा करंट लागल्यानंतरही बचावला पण...; मृत्यूच्या दारातून परत आल्यानंतरची अवस्था पाहूनच हादराल त्यामुळे रिलेचे पालक आणि डॉक्टरांनी पालकांना आवाहन केलं आहे की, मुलांच्या कोणत्याच खेळाला, कार्यांना हलक्यात घेऊ नका. ते पडले किंवा त्यांनी छोटी दुखापत झाली तर सतर्क राहा. कधी कोणता दुर्लक्षपणा आणि दुखापत जीवघेणी ठरेल सांगू शकत नाही.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Parents and child, World news

    पुढील बातम्या