Home /News /lifestyle /

Shocking! बहीण-भावाने एकमेकांशी केलं लग्न; जन्माला आलं विचित्र मूल, काही तासांतच मृत्यू

Shocking! बहीण-भावाने एकमेकांशी केलं लग्न; जन्माला आलं विचित्र मूल, काही तासांतच मृत्यू

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

पहिल्या नवऱ्यापासून असलेलं महिलेचं पहिलं मूल हे सामान्य होतं. पण दुसरं मूल तिला तिच्या भावापासून झालं होतं.

    ताशकंत, 04 जुलै :  बहीण-भाऊ एकमेकांच्या प्रेमात पडले, त्यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन पळून लग्न केलं अशी काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील (Brother sister Love). बातम्या असतील किंवा प्रत्यक्षातही तुमच्यासमोर असं काही घडलं असेल. पण बहीण-भावाने एकमेकांशी लग्न करण्याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात, याचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे (Brother sister marriage). एका बहीण-भावाने लग्न करून एका बाळाला जन्म दिला पण त्यांच्या या नात्याचा परिणाम त्या बाळाला भोगावा लागला.उज्बेकिस्तानच्या (Uzbekistan) डस्टलिकमध्ये एका बाळाच्या जन्मानंतर खळबळ उडाली आहे (Child Born With Genetic Disorder). त्याच्या अवस्थेचं कारण त्याचे आईवडील. कारण ते दोघंही नात्याने भाऊ-बहीण होते. उज्बेकिस्तानाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 4 जूनला या बाळाचा जन्म झाला. 35 आठवडे 4 दिवसांनी बाळ जन्माला आलं. त्याची उंची 47 मीटर होती. वजनही खूप कमी होतं. त्याची अवस्था खूप वाईट होती. पूर्ण शरीरावरील त्वचा सापासारखी होती. डॉक्टरांच्या मते, त्याला Ichthyosis congenita हा आजार होता. ज्यामध्ये त्वचा लाल, कोरडी आणि खरखरीत होते. त्वचेवरून माशांसारखे खवले निघतात. तसंच त्याला बरेच जीवघेणे आजारही होते. हे वाचा - एक्स-गर्लफ्रेंडच झाली सावत्र आई; या कारणामुळे तरुणीने बॉयफ्रेंडच्या वडिलांसोबतच केलं लग्न डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण जन्माच्या 2 तास 10 मिनिटांनीच त्याचा मृत्यू झाला. गुंतागुंतीमुळे मूल जगू शकलं नाही. या घटनेचं फुटेज उज्बेकिस्तानच्या एका रुग्णालयातून बाहेर आलं. ज्यामध्ये नर्स बाळाला स्वच्छ करताना दिसत आहे. बाळाची अवस्था पाहून कुणाचाही थरकाप उडेल. बाळाची अशी स्थिती होती ती त्याच्या आईवडिलांमुळे. बाळाचे पालक खरंतर भाऊ-बहीण होते. महिलेचं हे दुसरं मूल होतं. महिलेला आधीच्या नवऱ्याकडून एक मूल होतं. जे पूर्णपणे सामान्य आहे. पण तिच्या दुसऱ्या मुलाचे वडिल तिचाच भाऊ होता. हे वाचा - July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात सुंदर अन् हटके नावं; पहा यादी हिंदू धर्मात लग्नाबाबत काही नियम आहेत. त्यापैकी एक म्हणजे एकाच गोत्रात लग्न न करणं. खरंतर याला वैज्ञानिक आधारही आहे. एकाच जीन्समध्ये लग्न केल्याने त्याचे परिणाम त्यांच्या मुलांना भोगावे लागतात. हे या प्रकरणातून समोर आलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Couple, Lifestyle, Relationship, Viral

    पुढील बातम्या