अन् अचानक जेवणाच्या ताटातून चालू लागलं चिकन, व्हिडीओ झाला VIRAL

अन् अचानक जेवणाच्या ताटातून चालू लागलं चिकन, व्हिडीओ झाला VIRAL

ऐकायला आणि वाचायला कितीही विचित्र वाटत असलं तरी अशीच एक घटना अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये घडली आहे.

  • Share this:

अनेकजण चिकन खाण्यासाठी मांसाहार करतात. कोणत्याही मांसाहाही हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्हाला चिकनचे एक ना अनेक पदार्थ दिसतील. तुम्हालाही जर चिकन आवडत असेल तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे. पण एकदा विचार करा की, तुम्ही जर एखादा चिकनचा पदार्थ ऑर्डर केला असेल आणि नंतर तुम्हाला मस्त गरमागरम पदार्थ देण्यात आला. तुम्ही त्यावर ताव मारणार इतक्यात चिकन एकदम उठून चालायला लागलं तर... ते पाहून तुम्हाला कदाचित धक्का बसेल. हे ऐकायला आणि वाचायला कितीही विचित्र वाटत असलं तरी अशीच एक घटना अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये घडली आहे.

फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या फिलिप्सने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत हॉटेलच्या टेबलवर कच्च चिकन ठेवलेलं दिसत आहे. कोणाचाही हात न लावता चिकनचा पीस अचानक प्लेटमधून बाहेर येतो आणि जमिनीवर उडी मारतो.

असं असलं तरी चिकन चालणाऱ्या या व्हिडीओत किती सत्य आहे हे कळलेलं नाही. तसेच हा फेक व्हिडीओ आहे की नाही हे ही कळू शकलेलं नाही. कोणत्या हॉटेलमध्ये हा व्हिडीओ शूट झाला याबद्दलही पक्क काही कळू शकलेलं नाही. तरीही आतापर्यंत 19 दशलक्ष लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून 2 लाखांहून अधिक लोकांनी शेअरही केला आहे. या व्हिडीओमागचं सत्य काहीही असो पण पहिल्यांदा व्हिडीओ पाहताना तुम्हाला आश्चर्य वाटेल यात काही शंका नाही.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

VIDEO: पंतप्रधान मोदींच्या या 7 फेवरेट आसनांनी फिटनेस आहे 'मुमकिन'

...म्हणून पंतप्रधान मोदी आहेत फिट, असा असतो त्यांचा दिवसभराचा हेल्दी आहार

डेंग्यूशी निगडीत या 7 गैरसमजांवर तुम्हीही ठेवत असाल डोळे बंद ठेवून विश्वास

जेव्हा साडी नेसून मुलांनी केला रॅम्प वॉक, TikTok व्हिडीओ झाला VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 04:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading