सावधान! चिकन पॉक्स रोगाचा वाढतोय धोका, अशी घ्या काळजी

सावधान! चिकन पॉक्स रोगाचा वाढतोय धोका, अशी घ्या काळजी

जगभरात चिकन पॉक्स आजाराचा धोका दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. 300 हून अधिक संशयित रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर: आशियातून चिकन पॉक्स हद्दपार झाल्याची घोषणा 1975 रोजी वर्ल्ड हेल्थ संस्थेनं केली होती तर 1980 नंतर संपूर्ण जागातून हा आजार नाहीसा झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र चिकन पॉक्सचे महाकाय विषाणू आशियात परतण्याचा धोका वाढत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याला कांजण्या असंही म्हणतात. हा एक संसर्गजन्य आजार आहे. हा आजार व्हेरिसेला झोस्टर या विषाणूमुळे होतो. या आजारादरम्यान व्यक्तीचा संपर्कात असणाऱ्यांनाही हा आजार होण्याचा धोका असतो. हा आजार फक्त लहान मुलांनाच होतो असं नाही. कोणालाही होण्याची शक्यता असते मात्र याचं प्रमाण लहान मुलांमध्ये याचं प्रमाण जास्त असतं. या रोगासाठी कायमस्वरूपी उपाययोजना उपलब्ध नाही झाल्या तर पुन्हा एकदा कांचण्यांचे विषाणू महाकाय रुप घेतील आणि साथीचा रोग पसरण्यास वेळ लागणार नाही.

अफ्रिकेच्या काही भागांमध्ये हा आजार पसरण्यास सुरुवात झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे तिथल्या सरकारनं आणीबाणी घोषित केली आहे. जगभरात आतापर्यंत चिकन पॉक्सचे तीनशेहून अधिक रुग्ण आढळल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

वाचा-थंडीच्या दिवसात पपई खाणं शरीराला घातक, अनेक आजारांना निमंत्रण!

एक असा जमाना होता ज्यावेळी कांजण्यांवर कोणताही उपाय उपलब्ध नव्हता. कांजण्यांमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्याही येत होत्या. मात्र आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत. हा आजार होऊ नये आणि झाला तरी त्या विषाणूंपासून लढण्याची ताकद या वॅक्सीनेशनमध्ये असते. त्यामुळे लहान मुलांना याचं वॅक्सीनेशन दिलं जातं.

भारतालाही आहे कांजण्यांचा धोका

बऱ्याचवेळी आपल्याकडे लहानपणी कांजण्या येऊन गेल्या आता येणार नाहीत असं म्हटलं जातं. परंतु आता पुन्हा हा आजार डोकं वर काढू पाहात असल्यानं काहीसं भीतीचं वातावरण आहे.

कांजण्या होण्याची लक्षण काय? कसा पसरतो आजार

चिकन पॉक्स किंवा कांजण्या हा आजार होण्याआधी अंगावर लाल रंगाची बारीक पुरळ येतात. त्याची अंगावर आग होते. बऱ्याचदा खूप खाज सुटते. हे फोड फुटल्यानं त्यातील पाणी इतर ठिकाणी लागून आणखी फोड येतात. पुरळांचे प्रमाण छाती, पोट, पाठीवर जास्त प्रमाण असतं. या पुरळांचे त्वचेवर काळे डाग कायम राहतात. बऱ्याचदा या काळात ताप, सर्दी, खोकला येण्याची शक्यता असते.

असा आजार झाल्यास सुदृढ व निरोगी व्यक्तीपासून दूर राहावं. आपले कपडे आणि वस्तू वेगळ्या ठेवाव्यात हा आजार संसर्गजन्य असल्यानं तातडीनं त्याची लागण होण्याची शक्यता असते.

कशी घ्याल स्वत:ची काळजी

कांजण्या आल्यानंतर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आपले कपडे, सामान इतरांपासून वेगळं ठेवा. अशावेळी शक्यतो कॉटन कापडा व्यतिरिक्त इतर मटेरियल वापरणं टाळावं.

थंड आणि हलक्या स्वरुपाच्या आहाराचा जेवणात समावेश करावा. ज्यामुळे शरीरात पचायला जड होणार नाही आणि आरामही मिळेल. कांजण्या आल्याने शरीरात खूप सारी उष्णता उत्पन्न होते. त्यामुळे थंड किंवा फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण असे केल्याने इंफेक्शन फुफ्फुसांपर्यंत जावून न्युमोनिया होण्याची भिती असते त्यामुळे थंड गुणधर्म असलेले पण फ्रिजमधील नाही असे पदार्थ खाण्यावर भर द्यावा.

या दिवसांमध्ये विशेष स्वच्छता राखणं आवश्यक आहे. यासोबतच जास्त पाणी प्यावं. त्यामुळे शरीरातील नको असणारे टॉक्सिन बाहेर पडण्यास मदत होते.

वाचा-अरे देवा! एका अवलियानं विकलं 85 लाखांचं एक केळं, वाचा काय आहे प्रकरण

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2019 11:39 AM IST

ताज्या बातम्या