पांढरे केस, फॅशन म्हणून नाही तर भीतीनं संपूर्ण गावानं केलं Hair colour; केसांना दिला लाल रंग

पांढरे केस, फॅशन म्हणून नाही तर भीतीनं संपूर्ण गावानं केलं Hair colour; केसांना दिला लाल रंग

या गावात लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाचे केस (hair) लाल दिसतील.

  • Share this:

रायपूर, 04 नोव्हेंबर : पांढरे केस (White hair) लपवण्यासाठी केसांना डाय (hair dye) किंवा मेहंदी (mehandi) लावली जाते. हल्ली फॅशन म्हणून केसांना वेगवेगळे रंग (hair colour) दिले जातात. हेअर कलर करण्याची क्रेझ तरुणांमध्ये पाहायला मिळते. मात्र तुम्हाला ऐकून थोडं आश्चर्य वाटेल एक असं गाव आहे, जिथं सर्वांनीच आपले केस कलर केले आहेत. या गावात सर्वांचेच केस लाल दिसतील. पांढरे केस लपवणं किंवा फॅशन हा यामागील उद्देश नाही. तर या गावाने एका गोष्टीचा धसका घेतला आहे आणि त्यापासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थांनी आपले केस लाल केले आहेत.

छत्तीसगढच्या (chhattisgarh) दुर्ग जिल्ह्यातील धमधा ब्लॉक. या गावात तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रत्येकाचे केस लाल दिसतील. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक महिला-पुरुष सर्वांचेच केस लाल दिसतील. असे केस रंगवल्याने आपल्याला कोरोना होणार नाही, असं या ग्रामस्थांना वाटतं हे केस नैसर्गिकरित्या लाल नाहीत तर त्यांना त्यांना कृत्रिम रंग देऊन लाल करण्यात आले आहेत. बरं हे केस लाल करण्यामागे कोणती प्रथा, परंपरा नाही तर आहे तो अंधविश्वास. कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी या लोकांनी आपल्या केसांना लाल रंग दिला आहे. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला.

हे वाचा - ऑनलाईन ऑर्डर केला 40 हजार रुपयांचा मोबाईल; पार्सल उघडताच बसला मोठा धक्का

कोरोना महासाथीपासून वाचवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर, स्वच्छता यावर भर दिला जातो आहे. दुसरीकडे कोरोनाविरोधात प्रभावी औषध आणि लस तयार केली जाते आहे. मात्र याचदरम्यान धमधा ब्लॉकमधील ग्रामस्था मात्र कोरोनापासून बचाव करण्यासाठी केस लाल करत आहेत.

हे वाचा - बदलत्या CORONA लाही घाबरण्याची गरज नाही; प्रत्येक स्ट्रेनवर प्रभावी अशी लस तयार

आता बचावाचा हा मार्ग त्यांना कुणी सांगितला. झी न्यूजच्या रिपोर्टनुसार 15 दिवसांपूर्वी एका महिलेच्या स्वप्नात त्यांचं आराध्य दैवत बूढादेव आले आणि त्यांनी संपूर्ण समजाताली लोकांना आपले केस डाय करा म्हणजे कुणालाच कोरोना होणार नाही, असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी लगेचच महिलेनं आपल्या स्वप्नानबाबत सर्व ग्रामस्थांना सांगितलं आणि मग गावातल्या सर्व लोकांनी आपले केस रंगवायला घेतले, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

Published by: Priya Lad
First published: November 4, 2020, 9:29 PM IST

ताज्या बातम्या