Home /News /lifestyle /

हावभाव पाहा तो माझ्याच पोटचा गोळा; 20 वर्षांनी महिलेनं केला मूल बदलल्याचा दावा

हावभाव पाहा तो माझ्याच पोटचा गोळा; 20 वर्षांनी महिलेनं केला मूल बदलल्याचा दावा

ही लस वेळेआधी बाळ जन्माला येण्याचं रिस्क कमी करतं. शिवाय कोव्हीड पॉझिटीव्ह असताना जरी बाळाचा जन्म झाला तरी, त्याला कोरोनाचा धोका कमी होतो. रॉयल कॉलेज ऑफ ओब्स्टेट्रिशियन ऍन्ड गायनाकॉलॉजिस्ट डॉ. पैट ओ'ब्रायन यांच्यामते ही लस फायदेशीर आहे त्यामुळे गर्भवती महिलांनी कोरोना लशीबद्दल मना शंका बाळगू नये.

ही लस वेळेआधी बाळ जन्माला येण्याचं रिस्क कमी करतं. शिवाय कोव्हीड पॉझिटीव्ह असताना जरी बाळाचा जन्म झाला तरी, त्याला कोरोनाचा धोका कमी होतो. रॉयल कॉलेज ऑफ ओब्स्टेट्रिशियन ऍन्ड गायनाकॉलॉजिस्ट डॉ. पैट ओ'ब्रायन यांच्यामते ही लस फायदेशीर आहे त्यामुळे गर्भवती महिलांनी कोरोना लशीबद्दल मना शंका बाळगू नये.

डिलीव्हरीच्या 20 वर्षांनंतर आईबाप आपली मूल बदलल्याची (baby changing) तक्रार घेऊन महिला आयोगाकडे आले.

    दीपक सिंह/रायपूर, 28 नोव्हेंबर : रुग्णालयात माझं मूल बदललं (baby changing) आहे, अशी तक्रार घेऊन एक महिला महिला आयोगाकडे आली. तसं मूल बदलण्याची तक्रार काही नवी नाही. मात्र एका जोडप्यानं आपलं मूल बदलण्याची तक्रार केली ती तब्बल 20 वर्षांनी. बरं 20 वर्षांनी त्यांनी हा दावा केला तो फक्त त्या मुलाच्या हावभावावरून. त्या मुलाचं वागणं, बोलणं आमच्याप्रमाणे आहे, त्यामुळे तो आमचाच मुलगा आहे. तो मुलगा आमच्या रक्ताचा, माझ्या पोटचा गोळा आहे, असा दावा तक्रारदार महिलेनं केला आहे. मूल बदलण्याबाबत अशी अजब तक्रार नोंदवण्यात आली आहे ती छत्तीसगढच्या (chattisgarh) राज्य महिला आयोगात (state woman commission). जशपूरमधील महिलांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी महिला आयोगानं जन सुनावणी घेतली होती. या सुनावणीत एक जोडपं आलं आणि त्यांनी 20 वर्षांपूर्वी आपलं मूल बदलल्याचं सांगितलं. 20 वर्षांपूर्वी एका रुग्णालयात आपली प्रसूती झाली. त्यावेळी आपल्या हातात मृत मुलगी देण्यात आली होती. मात्र खरंतर आपल्याला मुलगा झाला होता. जो दुसऱ्या गावात मोठा होतो आहे, असं मला समजलं. आज तो 20 वर्षांचा झाला आहे आणि त्याचं नाव कुलदीप आहे, अशी माहितीही या महिलेनं दिली. ही महिला हे कशावरून सांगते असं विचारल्यावर तिनं याचा अजब पुरावा दिला. त्या मुलाचा चेहरा, त्याचं बोलणं, वागणं, हावभाव आपल्या आणि आपल्या पतीप्रमाणे आहेत. त्यामुळे तो आपलाच मुलगा आहे, असं ती म्हणाली. हे वाचा - फक्त लग्नाचे फेरे घेतले आणि गुजरातमध्येच क्वारंटाइन झाली महाराष्ट्राची सून महिला आयोगानं महिलेची तक्रार रितसर ऐकून घेतली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यास सांगितलं आहे. आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी या प्रकरणात डीएनए टेस्टचे आदेश दिले आहेत. आता डीएनए टेस्टवरून ते मूल नेमकं कुणाचं आहे ते समजेल.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Chattisgarh, Small baby, Woman

    पुढील बातम्या