मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

वजन कमी करण्यासाठी सकाळी लिंबूपाणी पिताय; सोबत हा एक पदार्थ खायला विसरू नका

वजन कमी करण्यासाठी सकाळी लिंबूपाणी पिताय; सोबत हा एक पदार्थ खायला विसरू नका

लिंबूपाण्याला (lemon juice) या पदार्थाची जोड दिली तर त्याचा अधिक फायदा होतो.

लिंबूपाण्याला (lemon juice) या पदार्थाची जोड दिली तर त्याचा अधिक फायदा होतो.

लिंबूपाण्याला (lemon juice) या पदार्थाची जोड दिली तर त्याचा अधिक फायदा होतो.

  मुंबई, 30 डिसेंबर : आपलं आरोग्य चांगलं राहायला हवं असेल तर आपल्या खाण्या-पिण्याच्या अर्थात आहाराच्या सवयीही तशाच आरोग्यदायी असणं गरजेचं असतं. कोरोनाच्या काळात तर लोकांना आरोग्यपूर्ण आहाराचं आणि आरोग्यदायी सवयींचं महत्त्व काही प्रमाणात तरी पटलं आहे, असं म्हणायला वाव आहे. कारण तशी जागरूकता आपल्या आजूबाजूला पाहायला मिळते आहे. आरोग्यदायी सवयींची माहिती पुस्तकं, आपले डॉक्टर्स किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञ आदींकडून घेतली जातेच. शिवाय सोशल मीडियावर विविध चॅनेल्सपासून सेलेब्रिटींपर्यंत अनेक जण आपल्याला माहिती असलेल्या, आरोग्यासाठी चांगल्या असलेल्या  वेगवेगळ्या गोष्टींची माहिती पोस्टद्वारे देत असतात. अलिकडेच सेलेब्रिटी शेफ संजीव कपूर (Sanjeev Kapoor) यांनी एका ' हेल्दी मॉर्निंग ड्रिंक'ची माहिती शेअर केली आहे. सकाळी उठल्यावर ग्लासभर गरम लिंबूपाणी पिण्याचा (Lemon Water) शरीराला लाभ होतो, असं कपूर यांनी म्हटलं आहे. तसंच भिजवलेले एक टीस्पून मेथीचे (Fenugreek) दाणेही गरम लिंबूपाण्यासोबत खाणं आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि त्याचा वजन कमी करण्यासाठीही कदाचित लाभ होऊ शकतो, असं कपूर यांचं म्हणणं आहे.
  आपल्या शरीरात नको असलेले विषारी घटक अर्थात टॉक्सिन्स तयार होत असतात. हे अपायकारक घटक शरीराबाहेर टाकले जाण्याचं काम रोज सकाळी लिंबूपाणी व मेथीचे दाणे आहारात घेतल्यास होऊ शकतं, असं संजीव कपूर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. कारण हे घटक डिटॉक्सिफायर (Detoxifier) म्हणून काम करतात. लिंबूपाण्याचे फायदे लिंबूपाणी आरोग्याला बऱ्याच कारणांमुळे लाभदायक आहे. पहिली गोष्ट म्हणजे ते शरीरात पुरेसं पाणी राखण्याचं काम करतं. लिंबू हा सी व्हिटॅमिनचा (Vitamin C) चांगला स्रोत आहे. हे व्हिटॅमिन प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यास हातभार लावतं. त्वचा कोरडी होऊ नये म्हणून उपयुक्त असलेली अँटिऑक्सिडंट्सही (Antioxidants) लिंबात असतात. हे वाचा - हुडहुडी घालवण्यासाठी कडाक्याच्या थंडीत बिलकुल पिऊ नका दारू नाहीतर... त्याशिवाय सकाळी लिंबूपाणी प्याल्यास ते रेचक म्हणूनही काम करतं आणि बद्धकोष्ठतेचं (Constipation) निवारण करण्यास मदत करतं. लिंबातल्या सायट्रिक अॅसिडमधला (Citric Acid) सायट्रेट हा घटक लघवीची आम्लता कमी करतो. तसंच मूतखड्यांचं (Kidney Stones) विघटन करण्यास मदत करतो. त्यामुळे ते लघवीवाटे बाहेर पडून जाऊ शकतात. त्यामुळे मोठे मूतखडे होण्याची शक्यता कमी होते. मेथीच्या दाण्यांचे लाभ मेथीमध्ये प्रथिनं, खनिजं, व्हिटॅमिन्स आणि तंतुमय पदार्थ असतात. त्यात अँटिऑक्सिडंट्स असतात. शिवाय, कॅन्सर आणि मधुमेहाला प्रतिकार करणारे घटकही त्यात असतात. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यासाठीही मेथीचा उपयोग होतो. तसंच, कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी कमी करण्यासाठी मेथी उपयुक्त असून, त्यामुळे हृदयविकाराचा धोका (Heart Ailments) कमी होतो. हे वाचा - इथे केला जातो चक्क सापांना पाठीवर सोडत मसाज, VIDEO पाहून बसेल धक्का मग तुमच्या रोजच्या आहारात या 'मॉर्निंग ड्रिंक'चा समावेश करण्याबद्दल तुम्ही काय विचार करताय?
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Fitness, Health, Lifestyle, Weight loss

  पुढील बातम्या