लांबून वाटला चित्ता, समोर जाताच बसला मोठा धक्का; नेमकं काय झालं पाहा

लांबून वाटला चित्ता, समोर जाताच बसला मोठा धक्का; नेमकं काय झालं पाहा

एका दगडावर हा चित्ता अगदी शांतपणे बसला होता पण तो आक्रमक नव्हता.

  • Share this:

वॉशिंग्टन, 24 जानेवारी : अचानक समोर एखादा चित्ता (cheetah) दिसला तर कुणाच्याही तोंडचं पाणी पळेल, दरदरून घाम फुटेल, अंगाचा थरकाप उडले. असंच काहीसं झालं ते अमेरिकेतील एका व्यक्तीसोबत. त्याला त्याच्या समोर चित्ता दिसला आणि घाबरून त्याने थेट पोलिसांनाच फोन केला. पोलीस घटनास्थळी आले आणि अगदी सावधपणे त्या चित्त्याच्या जवळ गेले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला.

ही घटना आहे ओरेगनमधल्या Multnomah County मधील.  Multnomah County Sheriff's Office च्या  फेसबुक पेजवर ही घटना सविस्तर देण्यात आली आहे. फेसबुक पेजवर सांगण्यात आलं की, आम्हाला SW पोर्टलँँडरचा फोन आला. त्याने सांगितलं की ग्रीन हिल्सजवळ रस्त्याच्या वरच्या बाजूला एक बिग कॅट दिसली. तो प्राणी चित्त्यासारखा दिसतो आहे पण आक्रमक नाही. तसं या परिसरात बिग कॅट्स दिसणं नवं नाही पण चित्ता दिसणं हे आमच्यासाठी नवं होतं.

This morning, we received a call from a SW Portlander who reported seeing a big cat with “spots” in an elevated position...

Posted by Multnomah County Sheriff's Office on Friday, 18 December 2020

आमचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आणि आम्ही या परिसराजवळ असलेल्या ओरेगन प्राणीसंग्रहालायाला याची माहिती दिली. पण तिथून कोणताच प्राणी गायब झालं नसल्याचं त्यांनी सांगितलं. आमचे अधिकारी अधिक सावधपूर्वक त्या प्राण्याजवळ पोहोचले मात्र त्याच्या जवळ पोहोचताच ते थक्क झाले. कारण तो चित्ता नव्हता तर एक स्टफ्ड टॉय होता.

हे वाचा - बापरे! ॲनाकोंडा... साखर कारखान्याजवळ दिसला भलामोठा अजगर VIDEO VIRAL

ही घटना आणि हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Published by: Priya Lad
First published: December 22, 2020, 9:43 PM IST

ताज्या बातम्या