मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /आईस्क्रीम खरेदी करण्याआधी हा कोड नक्की तपासा; अन्यथा आरोग्यावर होतील परिणाम

आईस्क्रीम खरेदी करण्याआधी हा कोड नक्की तपासा; अन्यथा आरोग्यावर होतील परिणाम

पारंपरिक पद्धतीनुसार आईस्क्रीम बनवताना दुधाचा (Milk) वापर केला जात असला, तरी बदलत्या काळात दीर्घ काळ टिकणारं आईस्क्रीम बनवण्यासाठी कृत्रिम गोष्टींचा वापर केला जातो

पारंपरिक पद्धतीनुसार आईस्क्रीम बनवताना दुधाचा (Milk) वापर केला जात असला, तरी बदलत्या काळात दीर्घ काळ टिकणारं आईस्क्रीम बनवण्यासाठी कृत्रिम गोष्टींचा वापर केला जातो

पारंपरिक पद्धतीनुसार आईस्क्रीम बनवताना दुधाचा (Milk) वापर केला जात असला, तरी बदलत्या काळात दीर्घ काळ टिकणारं आईस्क्रीम बनवण्यासाठी कृत्रिम गोष्टींचा वापर केला जातो

  नवी दिल्ली 04 ऑक्टोबर : आईस्क्रीम (Ice cream)...जगभरातल्या जवळपास सर्वांच्या आवडीचा एक पदार्थ... फार कमी जण असे असतील, की ज्यांना आइस्क्रीम आवडत नाही. उन्हाळ्यात उकाड्यानं जिवाची काहिली होत असताना, थंडगार आईस्क्रीम बघूनच जीव थंडावतो. आजकाल बाजारात अनेक कंपन्यांची वेगवेगळ्या चवीची आईस्क्रीम्स वर्षभर मिळतात. त्यामुळे आजकाल वर्षभर आईस्क्रीम खाल्लं जातं. अर्थातच उन्हाळ्यात किंवा ऑक्टोबर हीट जाणवायला सुरुवात झाली, की आईस्क्रीमची मागणी अधिक असते. आईस्क्रीमचा उद्योग प्रचंड प्रमाणात विस्तारला आहे. अनेक बड्या कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत. त्यामुळे इतर उद्योगांप्रमाणे या उद्योगालाही सरकारी कायदे, नियम लागू आहेत. विशेषत: खाद्यपदार्थ व्यवसाय असल्यानं या बाबतीतले नियम अधिक काटेकोर आहेत.

  पारंपरिक पद्धतीनुसार आईस्क्रीम बनवताना दुधाचा (Milk) वापर केला जात असला, तरी बदलत्या काळात दीर्घ काळ टिकणारं आईस्क्रीम बनवण्यासाठी कृत्रिम गोष्टींचा वापर केला जातो. मात्र हे आईस्क्रीम फ्रोझन डेझर्ट म्हणून ओळखलं जातं. कायदेशीररित्या आइस्क्रीमच्या पॅकिंगवर तशी नोंद असणं आवश्यक आहे. सर्व उत्पादनांवर शिक्का, ISI मार्क (ISI Mark) अनिवार्य असतो. मालाच्या शुद्धतेबाबत विशेष काळजी घेणंही व्यावसायिकासाठी बंधनकारक असतं. लोकांच्या जिवाशी खेळ होऊ नये म्हणून सरकार विविध नियम, कायदे यांच्या मदतीनं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतं. त्याच वेळी आपली फसवणूक होऊ नये यासाठी दक्षता घेणं ही ग्राहकांचीही जबाबदारी असते.

  कोणत्या टॉनिकपेक्षा कमी नाही गूळ-हरभरा; एकत्र खाण्याने होतो बराच फायदा

  कोणतीही वस्तू खरेदी करताना सरकारी मान्यतेचा शिक्का बघणं, विशेषतः अन्नपदार्थ असेल तर त्यावर अन्नसुरक्षा विभागाचं (FSSAI ) चिन्ह असेल, याची खात्री करून घेणं महत्त्वाचं आहे. उत्पादन खरं आहे की बनावट, याची खात्री करण्यासाठी आईस्क्रीम खरेदी करताना बॉक्सवर किंवा पॅकेटवर IS 2802 चा टॅग आहे, याची खात्री करणं आवश्यक आहे. आईस्क्रीम कंपन्यांसाठी ब्यूरो ऑफ सर्टिफिकेशनने (Bureau Of Certification) हा कोड जारी केला आहे. यामुळे याचे आरोग्यावर कोणतेही प्रतिकूल परिणाम होणार नसल्याचं प्रमाणिकरण होतं.

  अन्नसुरक्षा आणि मानके नियमन 2011 कायद्याअंतर्गत विविध प्रकारची आईस्क्रीम्स आणि त्यांची गुणवत्ता मानकं निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार, साधं, चॉकलेट, फळं, नट्स, दुधाचं आईस्क्रीम, सॉर्बेट्स, फॅन्सी, मोल्डेड, नॉव्हेल्टीज, सॉफ्टी यासारख्या आईस्क्रीमच्या विविध प्रकारांनुसार निकष निश्चित करण्यात आले आहेत. आईस्क्रीमचा रंग, चव, साखरेचं प्रमाण यानुसार निकष निश्चित करण्यात आले आहेत.

  उपवास करूनही ठणठणीत राहाल; Navratri मध्ये फक्त हे पदार्थ खा

  यानुसार, समजा तुम्ही साधं आईस्क्रीम घेत आहात, तर त्याचा रंग आणि चव यांचं प्रमाण आईस्क्रीमच्या एकूण प्रमाणाच्या 5 टक्क्यांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. साध्या आईस्क्रीममध्ये व्हॅनिला, कॉफी, मॅपल आणि कॅरामल आईस्क्रीम यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, चॉकलेट आईस्क्रीम घेताना त्यातलं चॉकलेट किंवा कोकोचं प्रमाण तपासणं आवश्यक आहे. चोकोबार किंवा चोकोचिप्स इत्यादी आईस्क्रीम्समध्ये साखरेचं प्रमाण जास्त असू शकतं. यामध्ये 16 ते 17 टक्के साखर, तर 2.5 ते 3.5 टक्के कोको आणि इतर कृत्रिम घटक असू शकतात. ते योग्य प्रमाणात आहे की नाही हे तपासणं महत्त्वाचं आहे. अन्यथा आपल्या आरोग्यासाठी ते धोकादायक ठरू शकतं.

  First published:
  top videos

   Tags: Health Tips, Tasty food