कमी पैशांत जग फिरायचंय, तर व्हिसाशिवाय फिरा या 6 देशांत

जगातील सर्वात गरीब देशांपैकी हा एक देश आहे. पण तरीही इथली सुंदर स्थळ भल्या भल्या श्रीमंत देशांना लाजवतील अशीच आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 17, 2019 07:25 AM IST

कमी पैशांत जग फिरायचंय, तर व्हिसाशिवाय फिरा या 6 देशांत

कंबोडिया- दक्षिण आशियातील सर्वात सुंदर देशांपैकी एक देश म्हणजे कंबोडिया. कमी पैशांत सर्वोत्तम जीवन संस्कृती पाहायची असेल तर एकदा तरी या देशाला भेट द्या. इथलं अंकोरवाट मंदिर हे जगभरात प्रसिद्ध आहे. इथलं राहणीमान, खाद्य संस्कृती आणि फिरणं भारतीयांसाठी फार स्वस्त आहे. श्रीलंकेप्रमाणे कंबोडियाही भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हलवर देतं. इथे जाण्यासाठी तुमच्याकडे फक्त पासपोर्ट असणं आवश्यक आहे.

मकाऊ- या देशात जाण्यासाठी भारतीयांना व्हिसाची गरज नाही. हाँग काँगमार्गे मकाऊला जाणं जास्त योग्य. कॅसिनोची आवड असणाऱ्यांसाठी हा सर्वोत्तम देश आहे. या देशातील 20 टक्के लोकसंख्या ही कॅसिनोमध्येच काम करते. मकाऊ टॉवर, मकाऊ म्युझियम, कॅथड्रल ही ठिकाणं तुम्ही आवर्जुन पाहू शकता.

मालदीव- हिंद महासागराजवळ असलेलं हा देश छोट्या छोट्या बेटांनी सजलेला आहे. व्हिसाशिवाय इथे 30 दिवस राहता येऊ शकते. शॉपिंग, रेस्तराँ, बीच, निसर्गरम्य वातावरण या सगळ्याची मजा घ्यायची असेल तर एकदा तरी या देशात जाच. या देशाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वस्तात तुम्हाला लग्झरी आयुष्य जगता येऊ शकतं.

श्रीलंका- या देशात भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हल, अर्थात तेथे पोहोचल्यावर लगेच व्हिसा मिळतो. भारतापासून हा देश फक्त तीन तासांच्या अंतरावर आहे. भारतातून दरवर्षी जवळपास दोन लाख लोक श्रीलंकेत जातात. कोलोंबो, कँडी हिल स्टेशन, मटारा, रामायण कनेक्शन, किरिंडा अशी एकनाअनेक स्थळ पाहण्यासारखी आहेत. स्वस्तात फिरण्यासाठी हा एक उत्तम देश आहे.

भूटान- भारताच्या बाजूलाच असलेला हा देश पर्यटनासाठी सर्वोत्तम देश आहे. जगातील सर्वात गरीब देशांपैकी हा एक देश आहे. पण तरीही इथली सुंदर स्थळ भल्या भल्या श्रीमंत देशांना लाजवतील अशीच आहेत. हा देश फार सुखी आणि शांत आहे. भारतीयांना भूटान जाण्यासाठी व्हिसाची गरज लागत नाही.

Loading...

नेपाळ- हिमालयाच्या कुशीत वसलेला हा देश भारताला लागूनच आहे. इथे फिरायला भारतीयांना व्हिसाची गरज नाही. नयनरम्य निसर्ग आणि शांत वातावरणासाठी नेपाळ देशाला नक्कीच भेट देता येऊ शकते. इथलं वास्तव्य कोणतीही व्यक्ती विसरणं केवळ अशक्यच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 17, 2019 07:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...