चाणक्य नीती - जगात मौल्यवान आहेत फक्त 'या' 4 गोष्टी दुसरं काहीच नाही

चाणक्य नीती - जगात मौल्यवान आहेत फक्त 'या' 4 गोष्टी दुसरं काहीच नाही

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या मते, या चार गोष्टींमुळे कोणत्याही सामान्य माणसाला भरपूर सुख मिळेल.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : मौल्यवान काय असं विचारलं तर आपण सोनं, हिरे, मोती असं काही तरी सांगू. मात्र आचार्य चाणक्य यांनी जगातील अशा 4 मौल्यवान गोष्टी सांगितल्यात, की त्यापेक्षा दुसरं काहीच मौल्यवान नाही आणि फक्त या चार गोष्टींमुळे कोणत्याही सामान्य माणसाला भरपूर सुख मिळेल. रोजच्या जीवनात, कामात, व्यवहारात आणि आचरणात लक्षात ठेवायचे महत्त्वपूर्ण नियम पंडित कौटिल्य म्हणजेच आचार्य चाणक्यने सांगितले आहेत. चाणक्य यांना राजकारणातील पंडीत म्हटलं जातं. चाणक्यने सांगितलेले नियम आजही प्रासंगिक आहेत.

नात्रोदक समं दानं न तिथि द्वादशी समा।

न गायत्र्या: परो मंत्रो न मातुदेवतं परम्।।

चाणक्य नीतीच्या या श्लोकामध्ये जगात सर्वात मौल्यवान काय आहे हे आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे.

हेदेखील वाचा -  चाणक्यनीती: यश येईल तुमच्या मागे, पण 'या' गोष्टींपासून राहा सावधान

दान

दानाशिवाय दुसरी कोणतीच मोठी अशी गोष्ट नाही. अन्न आणि पाणी हे धरतीवरील महादान आहेत. या दानाशिवाय मौल्यवान असं काहीच नाही. जी व्यक्ती भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्या पाणी देते, तिच्यापेक्षा पुण्य आत्मा नाही.

एकादशी व्रत

आचार्य चाणक्य यांनी एकादशी तिथी ही सर्वात पवित्र अशी तिथी असल्याचं सांगितलं आहे. एकादशीला पूजा आणि उपवास केल्यानं विष्णूदेवाची कृपा आपल्यावर राहते. एकादशी तिथी विष्णूदेवाला प्रिय आहे.

गायत्री मंत्र

गायत्री मंत्र हा जगातील सर्वात असा शक्तिशाली मंत्र असल्याचं आचार्य चाणक्य यांनी सांगतिलं. देवी गायत्रीला वेदमाता म्हटलं गेलं आहे. गायत्री देवीमुळे चारही वेदांची निर्मिती झाली आहे.

आई

धरतीवर आईपेक्षा मोठं कोणीच नाही, असं सांगितलं आहे. आईपेक्षा ना कोणता देव मोठा, ना कोणतं तीर्थ आणि ना कोणता गुरू. आईची सेवा करणाऱ्या व्यक्तीला जगातील कोणत्याच तीर्थाची गरज नाही.

हेदेखील वाचा -  चाणक्यनीती : 'या' जागांवर 1 मिनिटही थांबलात तर व्हाल उद्ध्वस्त

First published: February 20, 2020, 7:44 AM IST
Tags:

ताज्या बातम्या