• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Lifestyle : या चुकीच्या सवयींमुळे अनेकजण वारंवार पडतात आजारी; तुम्ही सहज टाळू शकता

Lifestyle : या चुकीच्या सवयींमुळे अनेकजण वारंवार पडतात आजारी; तुम्ही सहज टाळू शकता

राज्यातील लसीकरणाच्या मोहिमेस 16 जानेवारीला सुरुवात झाली होती. प्रथम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने...

राज्यातील लसीकरणाच्या मोहिमेस 16 जानेवारीला सुरुवात झाली होती. प्रथम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने...

तुमच्या या सवयींमुळे तुम्ही वारंवार आजारी पडू शकता. आपण आज जाणून घेऊयात अशा कोणत्या सवयी आहेत, ज्या चांगल्या आरोग्यासाठी (Good health) आपण लगेच बदलायला हव्यात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : रोजच्या जीवनशैलीत नकळतपणे आपल्याला अनेक चुकीच्या सवयी (bad habits) लागलेल्या असतात. ज्या आपल्या आरोग्याला हानी पोहोचवतात. जर तुम्ही या सवयी बदलल्या नाहीत आणि त्याकडे दुर्लक्ष केलं तर त्या अनेक गंभीर आजारांचे कारण बनू शकतात. तुमच्या या सवयींमुळे तुम्ही वारंवार आजारी पडू शकता. आपण आज जाणून घेऊयात अशा कोणत्या सवयी आहेत, ज्या चांगल्या आरोग्यासाठी (Good health) आपण लगेच बदलायला हव्यात. याबाबत झी न्यूजने माहिती दिली आहे. जास्त खाण्याची सवय (habit of overeating) जास्त खाण्याची सवय सर्वसाधारण वाटत असली तरी ती अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकते. जास्त खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात आणि त्यामुळे शरीरात विविध अडचणी निर्माण होतात. त्यामुळं भुकेपेक्षा दोन घास कमी खावं, असं सांगितलं जातं. खूप जास्त पाणी पिणे तसं पाणी पिणं हे आरोग्यासाठी फायदेशीरच आहे. विविध आजार यामुळे आपल्यापासून दूरच राहतात. मात्र, जास्त पाणी पिणंही घातक ठरू शकते. विशेष म्हणजे कमी कालावधीत वारंवार पाणी पिणे टाळावे. तासन्तास टीव्ही पाहणे तासन्तास टीव्ही पाहण्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यामुळे कामेही नीट होत नाहीत आणि मग चिडचिड वाढते. टीव्ही पाहण्यात जास्त वेळ घालवल्यानं आपण महत्त्वाचा वर्कआऊटही स्कीप करू लागतो आणि याचे परिणाम म्हणून नंतर आपण अनेक आजारांना बळी पडू लागतो. लाकूड किंवा टूथपिकने दात घासणे लाकूड किंवा टूथपिकने दात साफ करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. लाकडाने दात साफ केल्याने हिरड्या खराब होतात आणि दातांचेही मोठे नुकसान होऊ शकते. हे वाचा - तुमच्याही शरीरावर चामखिळी वाढल्यात का? घालवण्यासाठी हे घरगुती उपाय ठरतील उपयोगी व्यायाम न करणं आजकालच्या धावपळीच्या काळात नियमित व्यायाम करणं फार गरजेचं बनलं आहे. बैठ्या जीवनशैलीमुळं कमी वयातच लोकांना विविध शारीरीक आजार होत आहेत. त्यामुळं आपलं कितीही बीझी शेड्युल असलं तरी व्यायामासाठी वेळ काढणंही काळाची गरज आहे. रोज किमान 30 मिनिटे व्यायाम करणं आवश्यक आहे. हे वाचा - Tummy Fat : पोटावरील चरबी होईल गायब; रेझिस्टन्स बँडसोबत घरीच करा हे 3 व्यायाम नाकातील केस कापणे सुंदर दिसण्यासाठी काही लोक नाकातील केस काढतात. यामुळे तुमचे जास्तच नुकसान होऊ शकते. नाकातील केस हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी फायदेशीर असतात. ते काढून टाकल्याने फुफ्फुसाच्या आजारांचा धोका वाढतो. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: