मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

30 दिवसांत 3 ग्रहण, कसा असू शकतो प्रभाव जाणून घ्या

30 दिवसांत 3 ग्रहण, कसा असू शकतो प्रभाव जाणून घ्या

ज्योतिष शास्त्राच्या मते, 21 जूनला सूर्यग्रहण हे भारतासह संपूर्ण जगासाठी खूप महत्वाचे आहे.

ज्योतिष शास्त्राच्या मते, 21 जूनला सूर्यग्रहण हे भारतासह संपूर्ण जगासाठी खूप महत्वाचे आहे.

ज्योतिष शास्त्राच्या मते, 21 जूनला सूर्यग्रहण हे भारतासह संपूर्ण जगासाठी खूप महत्वाचे आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई, 03 मे : खगोलप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. एकाच महिन्यात 3 ग्रहण पाहायला मिळणार आहेत. चंद्र ग्रहण आणि सूर्य ग्रहणाचा परिणाम आपल्या राशीवर होत असतो. जून ते जुलै या एक महिन्याच्या कालावधीमध्ये 3 ग्रहण पाहता येणार आहेत. 5 जून रोजी चंद्रग्रहणाने पहिलं ग्रहण सुरू होईल. यानंतर 21 जूनला सूर्यग्रहण, जे भारतासह आशिया आणि दक्षिण पूर्व युरोपमध्ये लोकांना पाहता येणार आहे. त्यानंतर 5 जुलैला चंद्र ग्रहण तीसरं आणि शेवटचं ग्रहण असेल. हे ग्रहण भारतात वगळता अमेरिका, अफ्रीका, दक्षिण पूर्व यूरोपमध्ये दिसणार आहे. या ग्रहणाचा अभ्यास खगोलशास्त्रज्ञ आणि ज्योतिष अभ्यासक करत असतात. या ग्रहणाचा काय आणि कसा परिणाम होणार हे अभ्यासातून मांडत असतातय जाणून घ्या या ग्रहणामुळे आपल्यावर काय परिणाम होणार आहे. ग्रहण म्हणजे काय सूर्य ग्रहण- जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. चंद्र ग्रहण-जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसतं. हे वाचा-लक्षण दिसण्याआधीच Cancer चं निदान करणार फक्त एक ब्लड टेस्ट, शास्त्रज्ञांचा दावा ग्रहणाचा कसा होतो परिणाम ज्योतिष शास्त्राच्या मते, 21 जूनला सूर्यग्रहण हे भारतासह संपूर्ण जगासाठी खूप महत्वाचे आहे. हे ग्रहण मिथुन राशीत असेल. ग्रहण काळात मंगळ मीन राशीत आणि सूर्य, बुध, चंद्र आणि राहूकडे पाहत आहे, जे एक अशुभ चिन्हाचे प्रतीक आहे. शनि, बुध, गुरु आणि शुक्र सारखे महत्त्वाचे ग्रह ग्रहण काळात फिरत राहतील. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची ही हालचाल संपूर्ण जगात अराजक स्थिती निर्माण करू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जगात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. हे वाचा-शरीर हेल्दी आणि मन शांत ठेवण्यासाठी उत्तम आहे Color Therapy संकलन, संपादन- क्रांती कानेटकर
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या