काही क्षणांत सुरू होणार छाया-प्रकाशाचा खेळ; कधी आणि कसा पाहायचा हा आकाशातला आविष्कार?

काही क्षणांत सुरू होणार छाया-प्रकाशाचा खेळ; कधी आणि कसा पाहायचा हा आकाशातला आविष्कार?

पुढचे 3 तास हा छायाप्रकाशाचा खेळ सुरू असेल. छायाकल्प प्रकारचं हे चंद्रग्रहण असणार आहे. ग्रहण पाहावं की नाही, कसं पाहावं, कसं दिसेल?

  • Share this:

मुंबई, 05 जून : वटपौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग आला आहे. थोड्याच वेळात अंतराळात रंगणाऱ्या सावल्यांचा खेळ पाहता येणार आहे. या महिन्यातलं पहिलं चंद्रग्रहण रात्री 11 नंतर लागेल. पुढचे 3 तास हा छायाप्रकाशाचा खेळ सुरू असेल. छायाकल्प प्रकारचं हे चंद्रग्रहण असणार आहे. काही ज्योतिष वर्तवणाऱ्यांनी हे ग्रहण अशुभ असल्याचं वर्तवलं होतं. पण खगोलशास्त्रज्ञांनी यात काही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. उलट पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनीसुद्धा ग्रहणात अशुभ काही नसल्याचा निर्वाळा दिला आहे. हा निसर्गाचा अविष्कार आवर्जून पाहा, असं सांगितलं आहे.

कसा आणि कधी पाहायचा?

या वर्षी 30 दिवसांमध्ये तीन ग्रहणं पाहण्याचा योग येणार आहे. त्यापैकी पहिलं ग्रहण शुक्रवारी खगोलप्रेमींना पाहता येणार आहे. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे.

एक वादळ आणि मुंबईत चमत्कार, अनेक वर्षांनी पहिल्यांदाच घडला असा प्रकार

चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट सावलीभोवती असलेल्या विरळ सावलीतून जेव्हा जाते त्यावेळी छायाकल्प चंद्रग्रहण दिसतं. याला मांद्य चंद्रग्रहण- Penumbral Eclipse असंही म्हणतात. भारतातून हे चंद्रग्रहण शुक्रवारी रात्री 11 वाजून 13 मिनिटांपासून ते उत्तररात्री 2 वाजून 37 मिनिचांपर्यंत असणार आहे. हे ग्रहण ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेचा पूर्व दक्षिण प्रदेशातही दिसणार आहे.

यावेळी लागोपाठ तीन ग्रहणे होत असल्याने ती अशुभ असल्याने काहीतरी वाईट घटना घडतील असे भाकीत काही ज्योतिषानी वर्तविले आहे त्यात काहीही तथ्य नसल्याचे ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. यापूर्वी सन २०१८ मध्येही लागोपाठ तीन ग्रहणे झाली होती . त्यावेळी काहीही वाईट घटना घडल्या नव्हत्या तसेच यानंतर सन 2029 मध्येही लागोपाठ तीन ग्रहणे होणार असल्याची माहिती श्री. दा. कृ. सोमण यांनी दिली.

'आगीशी खेळतोय भारत, सगळं काही जळून जाईल', चीनने पुन्हा एकदा दिला इशारा

धक्कादायक! केरळमध्ये याआधी झाला आहे हत्तीणीचा फटाक्यांमुळे क्रूर मृत्यू

 

 

First published: June 5, 2020, 10:07 PM IST

ताज्या बातम्या