Lunar Eclipse June 2020: चंद्र ग्रहणाचा 12 राशींवर काय होणार परिणाम, जाणून घ्या

Lunar Eclipse June 2020: चंद्र ग्रहणाचा 12 राशींवर काय होणार परिणाम, जाणून घ्या

जून महिन्याच्या सुरुवातीलाच 5 जूनला कंकणाकृती चंद्रग्रहण दिसणार आहे.

  • Share this:

मुंबई, 02 जून : जून महिन्याच्या सुरुवातीलाच 5 जूनला कंकणाकृती चंद्रग्रहण दिसणार आहे. खगोलशास्त्रज्ञांसाठी ही पर्वणी असणार आहे. या चंद्रग्रहणाचा राशींवर काय प्रभाव पडणार आणि त्यावेळी प्रत्येक राशीतील व्यक्तींना काय समस्या येऊ शकतात जाणून घ्या सविस्तर.

मेष - चंद्रग्रहण आपल्या कुंडलीतील आठव्या स्थानी असेल. त्यामुळे आपल्याला आरोग्याची अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. तणामुक्त जीवन जगण्याकडे लक्ष केंद्रीत करा.

वृषभ- जोडीदारासोबत आपले संबंध अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करावा लागेल. गैरसमजापासून दूर राहा.

मिथुन- वादविवाद होणार नाहीत याची काळजी घेणं आवश्यक आहे. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.

कर्क- , आपल्या मनात नकारात्मक विचार वाढतील, परिणामी आपण ताणतणाव आणि थकवा जाणवेल. योग आणि व्यायामाची गरज आहे.

सिंह - भूतकाळातील समस्या त्रास देऊ शकतात. कौटुंबीक वाद सोडवण्यासाठी उत्तम वेळ. आरोग्याबद्दल अधिक जागरुक राहा.

कन्या- आपल्या आर्थिक जीवनावर सर्वाधिक परिणाम होईल. तुम्हाला काम पूर्ण करण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे, यामुळे ते वेळेवर पूर्ण करण्यात तुम्हाला अपयशी ठरू शकतात.

तुळ- कामाच्या ठिकाणी आपल्याकडून चुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतर्क राहून चतुराईनं काम करावं.

वृश्चिक- आपण आपल्या प्रतिमेबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आरोग्याबाबतही काळजी घ्या कारण वाहन चालकांनी गाडी चालवताना सावधगिरी बाळगा.

धनु- आपली परिस्थिती सुधारेल. वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकाल. घाईनं गुंतवणूक करू नका.

मकर- हा वेळ आपल्यासाठी खूप शुभ असेल. व्यस्त असाल तरीही आपला वेळ चांगला जाईल. प्रिय व्यक्तींना वेळ देणं आवश्यक आहे.

कुंभ- अडचणींचा सामना करावा लागेल. आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. कोणतीही जोखीम पत्करू नका.

मीन- यावेळी तुमची कार्य क्षमता वाढेल, यामुळे तुम्ही तुमची सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्यास सक्षम असाल

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 2, 2020, 2:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या