मुंबई, 4 डिसेंबर : आचार्य चाणक्य हे महान मुत्सद्दी, राजकारणी आणि विचारवंत होते. त्यांनी आपल्या नीतीशास्त्रात मानवी जीवनाविषयी अनेक परिस्थितींवर भाष्य केले आहे. त्यांच्या या विचांरांना चाणक्य नीती म्हणून देखील ओळले जाते. त्यांच्या चाणक्य नीतीमधील काही गोष्टी आत्मसात केल्या तर माणूस कायम यशाचे शिखर गाठू शकतो. प्रत्येक माणसाला यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि समर्पणाची गरज असते. परंतु त्यांच्या हातून घडणारी एक चूक त्यांना अपयशी बनवू शकते.
तसेच एखाद्या व्यक्तीने या नीतींकडे दुर्लक्ष केले किंवा त्यांचे योग्यरित्या पालन केले नाही, तर त्याला अपयशाचा सामना करावा लागू शकतो. कारण आचार्य चाणक्य यांची धोरणं मानवी जीवनाचा आरसा असल्याचं म्हटलं जातं. चाणक्य यांनी त्यांच्या नीतींमध्ये मानवाच्या यश आणि अपयशाची कारणं सांगितली आहे. जाणून घेऊया काय आहेत ती कारणं?
हातउसने असो कि बँकेतून, कर्ज घेण्यासाठी हे दिवस अशुभ; फेडताना नाकीनऊ येऊ शकतं
एक छोटी चूक
आज आपण चाणक्य नीतीतील अशा धोरणाविषीयी जाणून घेणार आहोत, जी आहे माणसाकडून होणारी एक छोट्याशी चूक. चाणक्य नीतीनुसार एक छोटी चूक एखाद्याला जीवनात यशस्वी किंवा अयशस्वी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे ही गोष्ट टाळण्यासाठी एखाद्या व्यक्तीने आपल्या या सवयीवर मात केली तर त्याला जीवनातील प्रत्येक आनंद मिळू शकेल. अन्यथा त्याला जीवनात पश्चात्ताप करावा लागेल.
कोणती आहे ती चूक?
आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार माणसाला आपल्या मनावर नियंत्रण कसे ठेवायचे हे माहित असले पाहिजे. चाणक्यांनी आपल्या धोरणात म्हटले की जो माणूस आपल्या मनावर ताबा ठेवू शकत नाही तो यश मिळवू शकत नाही. त्याची ही छोटीशी चूक त्याच्या यशात अडथळा ठरते.
सर्वात मोठा अवगुण
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात सांगितल्या प्रमाणे मनावर नियंत्रण न ठेवणे हा माणसाचा सर्वात मोठा अवगुण आहे. ही सवय अनेक समस्यांना कारणीभूत ठरू शकते. जी व्यक्ती मनावर ताबा ठेवू शकत नाही ती आयुष्यात कधीच समाधानी होणार नाही.
नकारात्मक उर्जेची होईल राख-रांगोळी; घरात कापरासोबत जाळून पहा ही एक वस्तू
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Acharya chanakya, Chanakya niti, Lifestyle, Religion