मुंबई 09 नोव्हेंबर : आचार्य चाणक्य यांचे नीतिशास्त्र लोक आवर्जून वाचतात. हे असं शास्त्र आहे, ज्याचा लोक आपल्या दैनदिन आयुष्यात अंमलात आणतात. यामुळे आयुष्य सोप आणि सुखकर होते. मानवी जीवनात चाणक्याची धोरणे स्थापित करून किंवा त्यांचे पालन करून तुम्ही तुमचे जीवन चांगले बनवू शकता. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये अनेक कठीण संदेश दिले आहेत. हे संदेश खऱ्या आयुष्यात वापरणे, तुम्हाला कठीण वाटत असले, तरी देखील ते खूप फायदेशीर देखील ठरतात.
जीवनातील प्रत्येक कठीण परिस्थितीत, या नैतिकतेचे ज्ञान तुम्हाला चांगले काम करण्यास प्रवृत्त करेल आणि तुमचे जीवन नेहमीपेक्षा चांगले होईल.
हे ही वाचा : Chanakya Niti : बायकोनं नवऱ्यासाठी नेहमी कराव्यात 'या' गोष्टी
आचार्य चाणक्यांनी काही अशा गोष्टी करण्यासाठी सांगितल्या आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आयुष्यातील समस्यांना संपवू शकता आणि समस्येतून बाहेर येऊ शकतो.
आज चाणक्य नीतिमधील अशी गोष्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जी लोकांच्या आयुष्यात महत्वाची आहे. ते म्हणजे वृद्धत्व.
चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्राच्या चौथ्या अध्यायात पुरुष आणि स्त्रिया लवकर वृद्ध का होतात आणि कारणे नीट हाताळली तर तुमचे म्हातारपण लवकर येणार नाही.
या चौथ्या अध्यायाच्या 17 व्या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी स्त्रिया, पुरुष आणि घोडे यांच्या लवकर येणाऱ्या वृद्धत्वाबद्दल सांगितले आहे. जर तुम्ही चाणक्याच्या या श्लोकावर विश्वास ठेवला तर असे केल्याने तुम्ही स्वत:ला लवकर म्हातारे होण्यापासून रोखू शकता.
सर्वाधीक वेळ प्रवासात जाणे
चाणक्य नुसार जे लोक आयुष्याचा सर्वाधीक वेळ प्रवासात घालवतात, ते अकाली वृद्ध होतात. सततचा प्रवास हा थकवा आणतो, तसेच यामुळे खाण्यापिण्याच्या आणि राहणीमानाच्या सवयी विस्कळीत होतात, जे तुम्हाला म्हातारे बनवतात. त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. अशा परिस्थितीत तुम्ही लवकर म्हातारे देखील होतात.
घोड्याला पाळीव प्राणी बनवले तर तो म्हातारा होईल
आचार्य चाणक्य घोड्याबद्दल सांगतात की हा मुक्त फिरणारा प्राणी आहे. अशा स्थितीत तो कधीच म्हातारा होत नाही असे म्हणतात, पण घोड्याला खुंटीला बांधून ठेवला तर तो म्हातारपणाचा बळी ठरतो. ज्यामुळे तो चालणं, फिरणं विसरतो.
या कारणामुळे महिलांमध्ये लवकर वृद्धत्व येते.
आचार्य चाणक्य यांनीही या श्लोकाद्वारे स्त्रियांच्या वृद्धत्वाविषयी सांगितले आहे. हे थोडं विचित्र वाटेल पण ते चाणक्य यांनी आपल्या श्लोकात लिहिलं आहे. चाणक्य सांगतात की, जर एखाद्या स्त्रीला तिच्या पतीकडून शारीरिक समाधान मिळत नसेल, तर तिचे म्हातारपण तिला घेरते आणि अशा स्थितीत अशा महिला लवकर वृद्ध दिसू लागतात.
चाणक्याने असेही लिहिले आहे की सूर्यप्रकाशामुळे माणसाचे कपडे लवकर फाटतात म्हणजेच सूर्यप्रकाशामुळे ते लवकर म्हातारे होतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Acharya chanakya, Chanakya niti, Lifestyle, Wife and husband, Women