मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Chanakya Niti: यशस्वी होण्यासाठी सोडा मूर्खांची संगत; आयुष्य जगण्याचे 8 योग्य मार्ग

Chanakya Niti: यशस्वी होण्यासाठी सोडा मूर्खांची संगत; आयुष्य जगण्याचे 8 योग्य मार्ग

वेळ बघून बोलणारी व्यक्ती विद्वान असते.

वेळ बघून बोलणारी व्यक्ती विद्वान असते.

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या मते कोकिळा गाण्याची कला शिकेपर्यंत शांत राहते. त्याच प्रमाणे व्यक्तीने देखील स्वतःमध्ये चांगले बदल (Positive Change) घडवून आणायला हवेत.

  दिल्ली,3 जून : चाणक्य नीतिनुसार (chankya Niti) जी व्यक्ती विद्वान आहे, प्रसंग बघून बोलते आणि आपल्या शक्तीनुसार इतरांना मदत आणि प्रेम देते, क्रोधावर नियंत्रण ठेवते तिच व्यक्ती आयुष्यत यशस्वी होते. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या नीति कठीण काळामध्ये (Difficult Time)व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात.चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या (Good) आणि वाईट गोष्टी (Bad Things)ओळखण्याची क्षमता(Capacity)येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही (peaceful life)जगता येतं. त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. चाणक्य (Chanakya) हे एक कुशल राजकारणी,चतुर मुत्सद्दी, कूटनिती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचित होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य (Kautilya)  म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. चाणक्य नीति लोकांचं भविष्य उज्ज्वल बनवते आणि जीवन सुखी, शांतीपूर्ण करते. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिच्या माध्यमातून जीवनातल्या काही अडचणीवर उपाय सांगितले आहेत.खरंच जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर, आचार्य चाणक्य यांच्या नितीन चा आयुष्यात अनुकरण करायला हवा

  गुणवान व्यक्ती

  आचार्य चाणक्य यांच्या मते जी व्यक्ती गुणवान आणि पुण्यवान आहे. तिच व्यक्ती चांगलं आयुष्य जगते. ज्यांच्याकडे धर्म आणि गुण नाहीत. त्यांना आयुष्य जगतांना अनेक अडचणी येतात. त्यांचे कर्म त्यांना अंधकाराकडे घेऊन जातात.

  (लहान मुलांवरील कोरोना लशीचं ट्रायल थांबवा; याचिकाकर्त्याने का घेतली कोर्टात धाव?)

  योग्य वेळी बोला

  वेळ बघून बोलणारी व्यक्ती विद्वान असते असं आचार्य चाणक्य म्हणतात. त्यांच्यामते विद्वान व्यक्ती योग्य वेळी योग्य पद्धतीने बोलतात. इतरांना मदत  करण्यात पुढे असतात. आपल्या शक्तीनुसार लोकांना प्रेम आणि सेवा देतात. विद्वान व्यक्तींचं आपल्या रागावर नियंत्रण असतं.

  वासनेवर मर्यादा

  चाणक्य नीतिनुसार एकाच वस्तूकडे दोन व्यक्ती वेगवेगळ्या दृष्टिकोनाने पाहू शकतात. तपस्वी व्यक्ती कोणत्याही वस्तूंची वासना करत नाहीत. ज्याप्रकारे कुत्र्याला प्रत्येक वस्तूमध्ये मांस दिसत असतं. तसंच, लंपट लोकांमध्ये स्त्रीकडे पाहून देखील वासना निर्माण होते.

  (Shocking! सेक्स डॉलशी लग्न करणाऱ्या बॉडीबिल्डरने डेटिंगसाठी घातली विचित्र अट)

  स्वत:त करा बदल

  चाणक्य नीति सांगते  गायनाची कला शिकेपर्यंत कोकिळा शांत राहते. जेव्हा, तिला गोड गळा मिळतो तेव्हाच गाऊन सगळ्यांना आनंद देते. त्यामुळेच माणसाने देखील कोकिळेप्रमाणे स्वतःमध्ये सकारात्मक आणि चांगले बदल घडवावेत.

  गुरूचं महत्त्व

  चाणक्य नीतिनुसार पुण्यकर्म आणि आशीर्वाद मिळवत राहिले पाहिजेत. त्यासाठी अध्यात्मिक ज्ञान मिळवायला हवं आणि त्या करतात गुरु करावा. गुरूशिवाय जीवन जगणे निरर्थक आहे.

  संतांची संगती

  आचार्य चाणक्य यांच्यानुसार वाईट व्यक्तींची संगत सोडून संतांच्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. यामुळे आपण सदैव चांगले कर्म करण्याचा विचार करतो आणि वाईट मार्गापासून परावृत्त होतो.

  (कोरोना व्हायरसचा समलिंगी व्यक्तींनाही फटका, त्यांच्या हक्काच्या जागा संकटात)

  ज्ञानाचं सामर्थ्य

  व्यक्ती उपकरणांचा वापर करून जमिनीखालून पाणी काढू शकतो. याचप्रमाणे विद्यार्थ्याने गुरुची सेवा केली तर गुरुचं ज्ञान त्याला प्राप्त होतं.

  मूर्खांसाठी दगडही रत्न

  चाणक्य नीतिनुसार या पृथ्वीवर अन्न-पाणी आणि गोड शब्द हेच खरे रत्न आहेत.पण मूर्ख लोक दगडांमध्ये रत्न शोधतात.पण,माणसाचं कर्मच त्यांच्या पाठीमागे येत असतात.

  (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

  First published:
  top videos

   Tags: Acharya chanakya, Chanakya niti