चाणक्य नीती – श्रीमंत होण्यासाठी असा करा धनाचा वापर, आचार्य चाणक्य यांनी सांगितलेला मार्ग

चाणक्य नीती – श्रीमंत होण्यासाठी असा करा धनाचा वापर, आचार्य चाणक्य यांनी सांगितलेला मार्ग

चाणक्य नीतीमध्ये (Chanakya neeti) आचार्य चाणक्य (Acharya chanakya) यांनी धनाचं महत्त्व सांगितलं आहे.

  • Share this:

मुंबई, 29 फेब्रुवारी : आचार्य चाणक्य हे महान विद्वान, राजकारणातील पंडित आणि अर्थशास्त्र तज्ज्ञ होते. त्यांच्या नीतींनी चंद्रगुप्त मौर्यसारख्या सर्वसामान्य व्यक्तीला सम्राट बनवलंरोजच्या जीवनात, कामात, व्यवहारात आणि आचरणात लक्षात ठेवायचे महत्त्वपूर्ण नियम पंडित कौटिल्य म्हणजेच आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहेत. त्यांनी सांगितलेले नियम आजही प्रासंगिक आहेत. चाणक्य नीती धनाबाबत काय सांगते पाहुयात

त्यजन्ति मित्राणि धनैर्विहीनं, दाराश्च भृत्याश्च सुहृज्जनाश्च।

तं चार्थवन्तं पुनराश्रयन्ते अर्थो हि लोके पुरुषस्य बन्धुः॥

चाणक्य सांगतात जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे सर्वप्रकारचं सुख साधन असेल, भरपूर धनधान्य असेल, तोपर्यंत त्याची साथ सर्वजण देतात मात्र जेव्हा त्याच्याकडे धन नसेल तेव्हा त्याच्या प्रिय वक्तीही त्याच्यापासून दूर जातात. धनाशिवाय माणूस लक्ष्यविहिन होतो, ज्यामुळे सर्वजण त्याच्यापासून दुरावतात.

हेदेखील वाचा - चाणक्य नीती – फक्त 'हे' 6 मूलमंत्र लक्षात ठेवा, यश तुमच्या मागे धावत येईल

अन्यायोपार्जितं वित्तं दशवर्षाणि तिष्ठति।

प्राप्ते चैकादशे वर्षे समूलम् तद् विनश्यति।।

आचार्य चाणक्य सांगतात, धन हे जगण्याचं साधन आहे, मात्र ते योग्य मार्गानं कमवणं गरजेचं आहे. अवैध आणि चुकीच्या मार्गानं कमवलेलं धन फायद्याचं नाही.  त्यामुळे नैतिक मार्गानंच धन कमवावं. जर कोणी हव्यासापोटी अनैतिक मार्गानं धन कमवलं तर असं धन 10 वर्षांपर्यंतच टिकतं.

हेदेखील वाचा - 'चाणक्य नीती'तून शिका संकटांशी कसा करावा सामना

उपार्जितानां वित्तानां त्याग एव हि रक्षणम् ।

तड़ागोदरसंस्थानां परिस्त्राव इवाम्भसाम् ।।

धनवान होण्यासाठी धनाचं संरक्षण करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे त्याचा वापर करणं. जसं एखाद्या भांड्यात ठेवलेलं पाणी वापरलं नाही तर ते खराब होतं, तसंच जे लोकं धन साठवून ठेवतात, त्याचा काहीच उपयोग करत नाही, असं धन एका विशिष्ट कालावधीनंतर काही उपयोगाचं नाही.

हेदेखील वाचा - चाणक्य नीती - जगात मौल्यवान आहेत फक्त 'या' 4 गोष्टी दुसरं काहीच नाही

First published: February 29, 2020, 7:22 AM IST

ताज्या बातम्या