मुंबई, 01 मार्च : आचार्य चाणक्य (Acharya chanakya) हे महान विद्वान, राजकारणातील पंडित आणि अर्थशास्त्र तज्ज्ञ होते. रोजच्या जीवनात, कामात, व्यवहारात आणि आचरणात लक्षात ठेवायचे महत्त्वपूर्ण नियम पंडित कौटिल्य म्हणजेच आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहेत. त्यांनी सांगितलेले नियम आजही प्रासंगिक आहेत. आयुष्यात अनेकदा आपण माणसं ओळखायला चुकतो. माणसांची पारख नेमकी कशी करावी, हे आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे.
यथा चतुर्भि: कनकं परीक्ष्यते निघर्षणं छेदनतापताडनै:।
तथा चतुर्भि: पुरुषं परीक्ष्यते त्यागेन शीलेन गुणेन कर्मणा।।
चाणक्य नीतीच्या पाचव्या अध्यायातील हा दुसरा श्लोक आहे. या नीतीनुसार सोन्याची पारख करण्यासाठी सोनं घासलं जातं, आगीत तापवलं जातं. सोनं अस्सल आहे की नाही हे तपासलं जातं. सोनं बनावट तर नाही ना हे ओळखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे त्याची तपासणी केली जाते. अशाप्रकारे व्यक्तींची पारख करणं गरजेचं आहे.
हेदेखील वाचा - चाणक्य नीती – श्रीमंत होण्यासाठी असा करा धनाचा वापर
त्याग
कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी ती व्यक्ती दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वत:च्या सुखाचा त्याग करू शकते की नाही हे पाहा. जर ती व्यक्तीच्या दुसऱ्याच्या सुखासाठी स्वत:च्या सुखाचा त्याग करत असेल तर तिच्यावर विश्वास ठेवू शकता.
चरित्र
ज्या व्यक्तीचं चरित्र चांगलं आहे, म्हणजे दुसऱ्यांप्रती त्यांच्या मनात चुकीचे, वाईट विचार नाहीत. अशा व्यक्तींवर तुम्ही विश्वास ठेवू शकता.
गुण
ज्यांच्यामध्ये राग, आळस, स्वार्थ, घमेंड, खोटं बोलणं असे अवगुण असतील, त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नये. शांत, नेहमी खरं बोलणाऱ्या व्यक्ती श्रेष्ठ असतात.
कर्म
अवैध कामं करून धन कमावणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. अशी लोकं स्वार्थी असतात आणि तुम्हाला कधीही फसवू शकतात. नैतिक मार्गाने पैसे कमावणाऱ्यांवरच विश्वास ठेवा.
हेदेखील वाचा - 'चाणक्य नीती'तून शिका संकटांशी कसा करावा सामना मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.