चाणक्य नीती – 'या' 7 गोष्टींपासून दोन हात लांबच राहा, जवळ गेलात तर करावा लागेल संकटांचा सामना

चाणक्य नीती – 'या' 7 गोष्टींपासून दोन हात लांबच राहा, जवळ गेलात तर करावा लागेल संकटांचा सामना

संकटं सांगून येत नाहीत, त्यामुळे अशा संकटांपासून सावधच राहायला हवं. त्यासाठी कोणत्या गोष्टींपासून दूर राहायला हवं, हे आचार्य चाणक्य (Acharya chanakya) यांनी सांगितलं आहे.

  • Share this:

मुंबई, 02 मार्च : आचार्य चाणक्य  (Acharya chanakya)  हे महान विद्वान, राजकारणातील पंडित आणि अर्थशास्त्र तज्ज्ञ होते. रोजच्या जीवनात, कामात, व्यवहारात आणि आचरणात लक्षात ठेवायचे महत्त्वपूर्ण नियम पंडित कौटिल्य म्हणजेच आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहेत. त्यांनी सांगितलेले नियम आजही प्रासंगिक आहेत. आचार्य चाणक्य यांनी अशा 7 गोष्टी सांगितल्यात ज्यापासून प्रत्येकाने सावध राहायला हवं. या गोष्टी जर जवळ आल्या तर समस्या वाढलीत, जीवनात दु:खच दु:ख येईल.

या 7 गोष्टींचा चाणक्य नीतीच्या सोळाव्या अध्यायातील चौथ्या श्लोकात वर्णन करण्यात आलं आहे.

कोऽर्थान्प्राप्य न गर्वितो विषयिणः कस्यापदोऽस्तं गताः

स्त्रीभिः कस्य न खण्डितं भुवि मनः को नाम राजप्रियः ।

कः कालस्य न गोचरत्वमगमत् कोऽर्थी गतो गौरवं

को वा दुर्जनदुर्गमेषु पतितः क्षेमेण यातः पथि ॥

संबंधित - चाणक्य नीती – माणसं ओळखायला चुकू नका, विश्वास ठेवण्याआधी अशी करा व्यक्तीची पारख

पैसा - पैसा मिळाल्यानंतर घमेंड येतं, ती व्यक्ती बदलते. पैसे आल्यानंतर बदलली नाही, अशी कोणतीच व्यक्ती नाही.

भोग आणि विलास - भोग आणि विलासात राहणाऱ्या व्यक्तीचं स्वत:वर नियंत्रण राहत नाही, अशी व्यक्ती शारीरिक आणि मानसिकरित्या दुखी असते.

स्त्री - स्त्रियांमुळे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी दु:ख जरूर येतं. मग ते प्रेमाच्या कारणानेही असतं.

राजा - चांगला, समजूतदार आणि न्यायप्रिय राजाची कृपा फक्त एका व्यक्तीवर नसते. असा राजा सर्वांना समान नजरेने पाहतो आणि वेळ आल्यास आपल्या प्रिय व्यक्तीलाही शिक्षा देतो.

काल - प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू अटळ आहे. त्यामुळे काळाच्या दृष्टीतून आतापर्यंत कुणीच वाचलेलं नाही.

याचक - याचक म्हणजे सातत्याने काहीतरी मागणारी व्यक्ती. एखादी व्यक्ती पैसा, वस्तू मागत असेल, तर अशा सवयीमुळे तिला कधीच सन्मान मिळत नाही.

दुष्ट व्यक्ती - वाईट सवयी कधीच बदल नाही. एकदा की दुष्ट आणि चुकीच्या व्यक्तींची संगत लागली की मग ती व्यक्ती चांगला माणून बनू शकत नाही आणि जरी चांगला माणूस बनली तरी कधी ना कधी तरी चुकीचं काम करतोच.

संबंधित - 'चाणक्य नीती'तून शिका संकटांशी कसा करावा सामना

First published: March 2, 2020, 8:29 AM IST

ताज्या बातम्या