चाणक्य नीती – कितीही संकटं आली, तरी तुम्ही न डगमगता कराल सामना; फक्त आचार्य चाणक्य यांचे मूलमंत्र लक्षात ठेवा

आचार्य चाणक्य (acharya chanakya) यांनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवल्यास आयुष्यातील कोणत्याही संकटांचा सामना तुम्ही करू शकाल.

  • Share this:

जे झालं ते झालं - जर जीवनात सुख, शांती हवी असेल, तर जे काही घडून गेलं ते विसरून जावं. आयुष्यात नेहमी पुढे चालत राहणं खूप गरजेचं आहे. जुन्या चुकीच्या गोष्टी आठवत राहून दु:खच मिळतं. भूतकाळ सोडून वर्तमानकाळ सांभाळायचा आणि भविष्य चांगलं करण्यासाठी काम करायचं.

चुकीच्या मार्गाने पैसा कमवू नका - आपलं चरित्र गमावून, यातना सहन करून, सदाचाराचा त्याग करून मिळवलेल्या धनाला काही अर्थ नाही. जे धन मिळवण्यासाठी शत्रूची हांजीहांजी करावी लागेल, असं धनही काही कामाचं नाही.

काटे आणि दुष्टांपासून वाचण्याचा उपाय - काटे पायात रूतू नयेत, यासाठी चप्पल घाला आणि दुष्ट व्यक्तींचा इतका अपमान करा की ते तुमच्यापासून कायमचे दूर होतील. तुमच्याजवळ येण्याची हिंमत त्यांची कधीच होणार नाही.

आपली कमजोरी दाखवू नका - साप विषारी नसला तरी तो फुत्कारणं सोडत नाही. अगदी तसंच कमजोर व्यक्तीने प्रत्येक वेळी आपली कमजोरी दाखवू नये.

आत्म्याची अनुभूती गरजेची - चारही वेद आणि धर्मशास्त्रांचा अभ्यास केला आहे, मात्र आपल्या आत्म्याची अनुभूती झाली नाही, अशी व्यक्ती म्हणजे एकप्रकारे चमचा आहे ज्याने कित्येक पदार्थ ढवळले, मात्र त्या पदार्थांचा स्वाद चाखला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2020 07:14 AM IST

ताज्या बातम्या