Home /News /lifestyle /

Hair Care Tips : केसांच्या प्रत्येक समस्येचा रामबाण इलाज आहे हा उपाय, जाणून घ्या योग्य पद्धत

Hair Care Tips : केसांच्या प्रत्येक समस्येचा रामबाण इलाज आहे हा उपाय, जाणून घ्या योग्य पद्धत

तेलाने चंपी केल्याने केवळ केसांना पोषण मिळत नाही, तर त्यामुळे टाळूमध्ये रक्त परिसंचरण देखील सुधारते, ज्यामुळे तणावाची पातळी खूप कमी होते. तेलाने चंपी करण्याचे अनेक फायदे आहेत, त्याबाबत जाणून घेऊया.

    मुंबई, 04 डिसेंबर : लहानपणी आपण पाहिले असेल की, आजी किंवा इतर वृद्ध स्त्रिया केसांना (Hair) तासन्तास तेल लावत असायच्या. त्यांचे केसही त्या काळी काळे, घनदाट आणि लांब असायचे. त्यावेळच्या खाण्या-पिण्याची गुणवत्ता हे याचे एक कारण असले तरी केसांना चंपी करण्याचा फायदा होत असे. पण, अलिकडे काहींना केसांना तेल (Hair Oil) लावण्याचीही लाज वाटते. डोक्याला तेल लावण्याला मागासलेल्या विचारसरणीशी जोडून पाहिले जाते. तेलाची जागा आता सीरमने घेतली (Hair care Tips) आहे. तेलाने चंपी करण्याचे केसांना खूप फायदे आहेत. ठराविक काळाने केसांना चंपी करत राहिल्यास केसांच्या प्रत्येक समस्येपासून सुटका मिळू शकते. तेलाने चंपी केल्याने केवळ केसांना पोषण मिळत नाही, तर त्यामुळे टाळूमध्ये रक्त परिसंचरण देखील सुधारते, ज्यामुळे तणावाची पातळी खूप कमी होते. तेलाने चंपी करण्याचे अनेक फायदे आहेत, त्याबाबत जाणून घेऊया. केसांची वाढ चांगली होते केसांना आठवड्यातून दोनदाही चंम्पी केल्यास केसांची वाढ चांगली होते. केस दाट होतात आणि केस गळणेही नियंत्रित होते. जर तुमचे केस खूप गळत असतील तर तुम्ही तेल हलके कोमट करून डोक्याला चंम्पी करावी. आतून पोषण मिळते तेल तुमच्या मुळांद्वारे त्वचेमध्ये प्रवेश करते आणि तुमच्या टाळूमध्ये खोलवर शोषले जाते. यामुळे तुमच्या केसांना आतून पोषण मिळते. केसांचा कोरडेपणा आणि कोंड्याची समस्या देखील कमी होते. कारण, यामुळे टाळूवरील कोरडेपणा पूर्णपणे नाहीसा होतो. हे वाचा - Happy Marriage: लग्नापूर्वी प्रत्येक मुलीनं आपल्या जोडीदाराला विचारायला हव्यात या 3 गोष्टी ताण कमी होतो आजच्या काळात तणावाची समस्या खूप वाढली आहे. त्यामुळे अनेकदा डोकेदुखीचा त्रासही होतो. चंपी केल्याने तणाव कमी होतो आणि डोकेदुखीही कमी होते. चंपी करण्यासाठी कोणते तेल वापरण्यास हरकत नाही, यासाठी तुम्ही त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. हे वाचा - Hair Care : तुमचेही केस होतील लांब, घनदाट काळे; पेरूच्या पानांचा फक्त असा करा वापर चंपी करण्याची योग्य पद्धत चंपी करताना टाळूला आणि केसांना तेल लावा. सुमारे 5 ते 10 मिनिटे चांगला मसाज करा. यानंतर केसांना शॉवर कॅप किंवा प्लास्टिकच्या पिशवीने झाकून टाका. यानंतर सुमारे एक तासभर तेल डोक्यावर तसेच राहू द्या. यानंतर डोके सौम्य शाम्पूने धुवा आणि कंडिशनरही लावू शकता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Woman hair

    पुढील बातम्या