मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Amavasya: पितृदोष, कालसर्पदोष निवारणासाठी आणि सुख-समृद्धीसाठी आजच्या अमावस्येला करा `हे` उपाय

Amavasya: पितृदोष, कालसर्पदोष निवारणासाठी आणि सुख-समृद्धीसाठी आजच्या अमावस्येला करा `हे` उपाय

शास्त्रानुसार, पितृ दोष (Pitru Dosh) आणि कालसर्प दोषामुळे (Kalsarpa Dosh) माणसाला जीवनात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. अमावास्येला काही सोपे उपाय करून हे दोष दूर करता येतात. आज फाल्गुनातली आणि वर्षातली शेवटची अमावास्या आहे.

शास्त्रानुसार, पितृ दोष (Pitru Dosh) आणि कालसर्प दोषामुळे (Kalsarpa Dosh) माणसाला जीवनात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. अमावास्येला काही सोपे उपाय करून हे दोष दूर करता येतात. आज फाल्गुनातली आणि वर्षातली शेवटची अमावास्या आहे.

शास्त्रानुसार, पितृ दोष (Pitru Dosh) आणि कालसर्प दोषामुळे (Kalsarpa Dosh) माणसाला जीवनात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. अमावास्येला काही सोपे उपाय करून हे दोष दूर करता येतात. आज फाल्गुनातली आणि वर्षातली शेवटची अमावास्या आहे.

दिल्ली, 1 एप्रिल: प्रत्येकाला जीवनात सुख-समृद्धी, यश, नावलैकिक आणि पैसा हवा असतो; पण सर्वांना या गोष्टी मिळतात असं नाही. या गोष्टी मिळाव्यात याकरिता काही जण ज्योतिषशास्त्र (Jyotish Shastra) आणि आध्यात्मिक गोष्टींकडे वळतात. शास्त्रानुसार, पितृ दोष (Pitru Dosh) आणि कालसर्प दोषामुळे (Kalsarpa Dosh) माणसाला जीवनात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या दोषांचं निराकरण करणं आवश्यक असतं. शुक्रवारी (1 एप्रिल) अमावास्या (Amavasya time) आहे. या अमावस्येला पितृ दोष, कालसर्प दोष निवारणासाठी, तसंच संततिप्राप्ती आणि धनप्राप्तिसाठी विशेष मानलं गेलं आहे. या दिवशी काही विशिष्ट पूजाविधी केले असता दोषमुक्ती होऊन संतती आणि धनप्राप्ती होते, असं जाणकार सांगतात. यादिवशी स्नान आणि तर्पणाला विशेष महत्त्व आहे. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती प्रसिद्ध केली आहे. दक्षिण भारत आणि उत्तर भारतात वेगवेगळी पंचांगं (Panchang) आहेत. उत्तर भारतीय पंचागानुसार 1 एप्रिल 2022 रोजी चैत्र अमावास्या आहे. महाराष्ट्रातल्या पंचांगानुसार अर्थात शालिवाहन शके कालगणनेनुसार, 1 एप्रिल 2022 रोजी फाल्गुन अमावास्या आहे. 31 मार्च रोजी दुपारी 12 वाजून 22 मिनिटांपासून अमावास्येला प्रारंभ झाला असून, 1 एप्रिलला सकाळी 11 वाजून 53 मिनिटांनी अमावास्या संपत आहे. या दिवशी स्नान, दान आणि तर्पणाला विशेष महत्व आहे. ही अमावास्या कालसर्प दोष आणि पितृदोष निवारणासाठी महत्वाची मानली जाते. या दिवशी काही विशेष विधी केल्यास या दोषांचं निवारण होतं.

हे वाचा- बुधाचा अस्त काळ या 3 राशींच्या लोकांना आणेल अडचणीत; कामे होता-होता बिघडतील

उत्तर भारतातल्या पंचांगानुसार, चैत्र अमावास्येला सकाळी ब्रह्म योग, तसंच दुर्मीळ इंद्र योगही होत आहे. सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योगही होत आहे. या योगावर शुभ कार्य केल्यास त्यात यश प्राप्त होते. चैत्र अमावस्येला शिव तांडव स्तोत्राचं पठण लाभदायी मानलं जातं. या स्तोत्रच्या पठणामुळे कालसर्प दोष नाहीसा होतो. तसंच या दोषातून मुक्त होण्यासाठी राहूचीदेखील पूजा केली जाते. एखाद्या शिव मंदिरात राहूची (Rahu) पूजा करणं लाभदायी मानलं जातं. या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं लाभदायी ठरतं. स्नानानंतर चांदीच्या नाग-नागिणीची पूजा केली जाते. त्यानंतर कालसर्प दोष मुक्तीसाठी प्रार्थना केली जाते. पूजा-प्रार्थनेनंतर नाग-नागिणीची मूर्ती नदीत विसर्जन केली जाते. यामुळे हा दोष शांत होतो, असं सांगितलं जातं. चैत्र अमावास्येला भगवान शंकराची (Lord Shiva) पूजा केल्यास कालसर्प दोषातून मुक्तता होते. या दिवशी शिवमंदिरात रुद्राभिषेक करण्यासोबतच शिवलिंगास दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा. यामुळे भगवान शंकराची कृपा होऊन कालसर्प दोष दूर होतो. आर्थिक समृद्धीसाठी ही अमावास्या महत्त्वपूर्ण मानली गेली आहे. या दिवशी श्री लक्ष्मीपूजेचं विशेष महत्त्व आहे. आर्थिक सुबत्ता येण्यासाठी या दिवशी घरातल्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा. चैत्र अमावास्येच्या दिवशी पितरांना अर्थात पूर्वजांना प्रसन्न केल्यानं संतती प्राप्तीसाठी त्यांचा आशीर्वाद मिळतो, अशी धार्मिक मान्यता आहे. पितरांच्या शापामुळे संततीसंबंधी अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्यांची पूजा करण्यासाठी ही अमावास्या योग्य मानली जाते. पितर प्रसन्न व्हावेत, यासाठी या दिवशी सकाळी स्नान करून पितरांना पाणी तर्पण करावे. या पाण्यात काळे तीळ अवश्य घालावेत. याशिवाय पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी याकरिता पिंडदान, ब्राह्मणांना दान आणि भोजन देणं, भोजनाचा काही भाग गाय (Cow) आणि कावळ्याला देणं हे विधी केले जातात. यामुळे पितर प्रसन्न होऊन वंशवृद्धी, सुख-समृद्धी आणि समाधानी जीवनासाठी आशीर्वाद देतात. या दिवशी पिठाचे छोटे गोळे करून ते मासे किंवा अन्य जलचर प्राण्यांना खायला दिल्यास घरात सुख-समृद्धी येते आणि जीवनातल्या अडी-अडचणी दूर होतात, असं जाणकार सांगतात.
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या