OMG VIDEO : 'चाय ला'! अमृततुल्य चहाच्या पुण्यात इथे मात्र मिळतो तंदुरी चहा!

'चाय ला' चे संस्थापक अमोल राजदेव म्हणतात,एकदा आमच्या आजीने थंडीच्या दिवसात शेकोटीतल्या कुल्हडमध्ये दूध हळद दिलं. त्यातूनच आम्हाला ही तंदुरी चहाची कल्पना सुचली. या कुल्हड चहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले घालून पाहिले. मसाले आणि मातीचा स्वाद यासोबत चहा प्यायला एक वेगळीच मजा आली.

News18 Lokmat | Updated On: Aug 3, 2019 08:59 PM IST

OMG VIDEO : 'चाय ला'! अमृततुल्य चहाच्या पुण्यात इथे मात्र मिळतो तंदुरी चहा!

पुणे, 3 ऑगस्ट : मस्त पाऊस पडतोय. अशा वातावरणात वीकेंडला कुठेही फिरायला गेलं की आपल्याला पहिली आठवण येते ती वाफाळत्या चहाची. एक भारतीय वर्षभरामध्ये किती कप चहा पितो ? याचं उत्तर तुम्हाला माहितीय ? याचं उत्तर आहे 800 कप !

आता जर एवढा चहा आपण पितो तर वेगवेगळ्या प्रकारचा चहा प्यायची हुक्की येतेच. अशा चहाच्या चाहत्यांसाठी पुण्यात एक दुकान आहे, 'चाय ला' ! इथे तंदुरी चहा मिळतो. तंदुरी चहा ? म्हणजे काय रे भाऊ ? असा एक पुणेरी प्रश्न तुम्ही विचाराल. पण इथल्या चहाच्या तंदूर भट्टीपाशी आलात तर तुम्हालाही हे सगळे प्रश्न विसरून हा चहा प्यावासा वाटेलच.

तंदूरमध्ये भाजलेल्या कुल्हडमध्ये हा चहा ओतला जातो. या कुल्हडच्या मातीचा स्वाद आणि सुवासही चहात मिसळतो.

'चाय ला' चे संस्थापक अमोल राजदेव म्हणतात,एकदा आमच्या आजीने थंडीच्या दिवसात शेकोटीतल्या कुल्हडमध्ये दूध हळद दिलं. त्यातूनच आम्हाला ही तंदुरी चहाची कल्पना सुचली. या कुल्हड चहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले घालून पाहिले. मसाले आणि मातीचा स्वाद यासोबत चहा प्यायला एक वेगळीच मजा आली.

Loading...

मार्च 2017 मध्ये त्यांनी हे 'चाय ला' सुरू केलं. हा चहा आरोग्यासाठीही गुणकारीही आहे. या चहामुळे रक्ताभिसरण वाढतं, पचनक्षमताही वाढे आणि तणावही दूर होतो. त्यामुळे या चहाला पुण्यातही चांगली मागणी आहे. या पावसात कधीतरी हा तंदुरी चहा ट्राय करायला हरकत नाही.

या हॉस्पिटलमध्ये 36 नर्सेस एकाच वेळी झाल्या प्रेग्नंट!

=========================================================================================================

  • VIDEO : EXCLUSIVE डे विथ लीडर - भावी मुख्यमंत्री सेनेचा? पाहा काय आहे आदित्य ठाकरेंच्या मनात

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-396697" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/Mzk2Njk3/"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2019 08:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...