मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मानेच्या वेदनांनी हैराण; होमिओपॅथिक उपचारांनी मिळवा आराम

मानेच्या वेदनांनी हैराण; होमिओपॅथिक उपचारांनी मिळवा आराम

 मानेच्या समस्येवर (neck pain) तुम्ही होमिओपॅथी (homeopathy) औषधांचाही वापर करू शकता.

मानेच्या समस्येवर (neck pain) तुम्ही होमिओपॅथी (homeopathy) औषधांचाही वापर करू शकता.

मानेच्या समस्येवर (neck pain) तुम्ही होमिओपॅथी (homeopathy) औषधांचाही वापर करू शकता.

  • myupchar
  • Last Updated :
    चुकीच्या पद्धतीनं झोपल्यामुळे किंवा एखाद्या स्नायूला झटका, स्नायू खेचले गेल्यानं अनेकदा मान दुखते. myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. केएम नाधीर यांनी सांगितलं, मानेच्या वेदना मानेवर जोर पडणं किंवा मान लचकल्यामुळे देखील होऊ शकतात. काळजी घेतली नाही तर भविष्यात अशा वेदना आणखी वाढू शकतात. मानेच्या समस्येवर तुम्ही होमिओपॅथी औषधांचाही वापर करू शकता. ही औषधं कोणती ती पाहुयात. सांधे आणि हाडे यांच्या वेदनांमध्ये कॉस्टिकम आहे सहाय्यक औषध ज्या लोकांना हाडे आणि सांध्यामध्ये जास्त वेदना होण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी कॉस्टिकमसारखे औषध खूप प्रभावी आहे. याशिवाय ज्यांना मान आखडण्याची किंवा त्यातील हाडांमध्ये दुखापत झाल्यासारखं वाटतं त्यांच्यासाठी देखील हे खूप फायदेशीर औषध आहे. चेलीडोनियम मेजस मान आणि खांद्याच्या दुखण्यात मदत करतं ज्या लोकांना मान आखडणं किंवा मान मुरगळणं, खांद्यामध्ये वेदना होत आहेत. अशा सर्व समस्यांच्या उपचारांमध्ये चेलीडोनिअम मेजास एक चांगलं होमिओपॅथिक औषध म्हणून कार्य करते. सिमीसिफुगा स्नायूंसाठी प्रभावी ज्यांना मेरुदंडाच्या हाडांशी संबंधित समस्या आहेत किंवा ज्यांना स्नायूंशी संबंधित समस्या आहेत. स्नायूंमध्ये मुरड, त्यावर ताण येऊन वेदना जाणवत असतील आणि मानेच्या आखडण्याचा त्रास असेल तर हे औषध यामध्ये फायदेशीर आहे. जेल्सीमियम स्नायू मजबूत बनवतं ज्या लोकांना स्नायूंमध्ये कमकुवतपणा येत राहतो, त्याबरोबरच पाठीत आणि मानेत तीव्र वेदना होतात. या सर्व प्रकारच्या वेदना दूर करण्यात जेल्सीमियमची मदत होते. जर शरीर थकल्यासारखे वाटत असेव तरीही जेल्सीमियम हे यासाठी एक प्रभावी होमिओपॅथी औषध ठरू शकतं. ब्रायोनिया आहे स्नायूंच्या वेदनांमध्ये उपयुक्त होमिओपॅथिक औषध ज्यांना सौम्य हालचाल किंवा कोणत्याही कृतीमुळे स्नायूंमध्ये वेदना जाणवते किंवा आखडलेल्या मानेमध्ये वेदना किंवा तणाव असल्यास अशा सर्व समस्यांसाठी ब्रायोनिया खूप फायदेशीर आहे. मानेच्या समस्येमध्ये देखील कॉस्टिकम प्रभावी मानेमध्ये कोणत्याही प्रकारच्या वेदना होत असतील तर कॉस्टिकमसारखं होमिओपॅथीक औषध यामध्ये खूप प्रभावी आहे. इतकंच नाही तर या औषधाचा उपयोग स्मृती कमी होणं, बोलण्यातील समस्या, त्वचेची जळजळ अशा इतर समस्यांसाठी देखील केला जाऊ शकतो. हायपरिकम परफेरेटम मज्जातंतू वेदना दूर करण्यात सहाय्यक नसांसंबंधी आजार बरा करण्यासाठी हे एक अतिशय प्रभावी औषध आहे. मानेत झोपण्याच्या चुकीच्या स्थितीमुळे, नसांमध्ये तीव्र वेदना होतात, ज्यामुळे मान हलवणंदेखील अवघड होतं. हे औषध नसांमधील वेदना कमी करण्यासाठी कार्य करतं. या व्यतिरिक्त हे औषध मेरुदंडाच्या हाडांशी संबंधित सर्व समस्यांवर चांगले उपचार देतं. पाठ, मान आणि खांद्यांमधील स्नायूंच्या वेदनांमध्ये सारकोलेक्टिकम एसिडम प्रभावी ज्यांना पाठ, मान आणि खांद्यांच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा आणि वेदना जाणवतात त्यांच्यासाठी हे औषध आराम देण्याचं कार्य करतं. हे औषध अत्याधिक थकवा आणि वारंवार झोप येणं यासारख्या इतर समस्यांसाठी देखील वापरलं जाऊ शकतंं. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख – सरव्हायकलचे दुखणे: लक्षणे ... न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीयमाहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेतस्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठीआरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
    First published:

    Tags: Health, Pain

    पुढील बातम्या