मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

भारतात कोरोना लशीला आपात्कालीन मंजुरी इतक्यात नाहीच; मोदी सरकारनं दिलं हे कारण

भारतात कोरोना लशीला आपात्कालीन मंजुरी इतक्यात नाहीच; मोदी सरकारनं दिलं हे कारण

ऑक्सफोर्डच्या (oxford) कोरोना लशीला (corona vaccine) यूकेमध्ये (UK) मंजुरी मिळाल्यानंतर भारतातही या लशीचा मार्ग मोकळा झाला आहे. पण केंद्र सरकारनं त्याबाबत निर्णय घेण्याची घाई केली नाही.

ऑक्सफोर्डच्या (oxford) कोरोना लशीला (corona vaccine) यूकेमध्ये (UK) मंजुरी मिळाल्यानंतर भारतातही या लशीचा मार्ग मोकळा झाला आहे. पण केंद्र सरकारनं त्याबाबत निर्णय घेण्याची घाई केली नाही.

ऑक्सफोर्डच्या (oxford) कोरोना लशीला (corona vaccine) यूकेमध्ये (UK) मंजुरी मिळाल्यानंतर भारतातही या लशीचा मार्ग मोकळा झाला आहे. पण केंद्र सरकारनं त्याबाबत निर्णय घेण्याची घाई केली नाही.

  • Published by:  Priya Lad
नवी दिल्ली, 30 डिसेंबर :  प्रत्येक जण कोरोना लशीची (corona vaccine)  आतुरतेनं वाट पाहत आहे. यूकेमध्ये (UK) ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीच्या आपात्कालीन वापराला (Emergency use) मंजुरी मिळाल्यानंतर भारतातही (India) या लशीला मंजुरी मिळेल अशी आशा होती. मात्र इतक्यात तरी या लशीला परवानगी मिळणार नाही, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (Oxford university) आणि अॅस्ट्राझेनकानं (Astra Zeneca ) तयार केलेल्या कोरोना लशीला यूकेमध्ये परवानगी देण्यात आली आहे. भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा (pune serum institue of india) या लशीत सहभाग आहे. भारतात ही लस कोव्हिशिल्ड (COVISHEILD) नावानं ओळखली जातं. ब्रिटनमध्ये या लशीच्या मंजुरीवर भारताचा निर्णय अवलंबून होता. त्यामुळे तिथं मंजुरी मिळताच भारतात या लशीला मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आजच या लशीला मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण तसं झालं नाही. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेनच्या (Central Drugs Standard Control Organisation - CDSCO) तज्ज्ञ समितीनं (SEC)  याबाबत आज बैठक घेतली. या बैठकीत सीरम इन्स्टिट्यूटसह फायझर (Pfizer) आणि भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) लशीबाबतही चर्चा करण्यात आली. या लशींची अतिरिक्त माहिती आणि अहवाल याची पडताळणी करण्यात आली. याबाबत आता पुन्हा 1 जानेवारी, 2021 ला विचारविनिमय केला जाणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. हे वाचा - ब्रिटनमधील नव्या कोरोनाला टक्कर देणार भारतीय लस; औषध कंपनीकडून मोठा दिलासा दरम्यान Astra Zeneca च्या सीईओंनी ही लस 95% प्रभावी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. लवकरच हा अहवालही आम्ही जारी करणार आहोत.  सरकारकडून काही दिवसांत परवानगी मिळेल आणि त्यानंतर आम्ही लस पुरवठा करू, असं सीरमचे सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी सांगितलं.  कोरोना लशीचे 40-50 दशलक्ष डोस तयार आहेत. आमच्याकडून किती डोस घ्यायचे आणि किती वेगानं लशीकरण मोहीम सुरू करायची याचा निर्णय आता सरकार घेईल. जुलै 2021 पर्यंत आम्ही जवळपास 300 दशलक्ष डोस उपलब्ध करून देणार आहोत. असंही पूनावाला म्हणाले. हे वाचा - CORONA VACCINE बद्दल धक्कादायक बाब समोर! लस घेताच नर्सला झाला कोरोना दरम्यान भारत बायोटेकनं आपली लस नव्या कोरोनाविरोधातही प्रभावी असल्याचा दावा केला आहे. ब्रिटनमधील कोरोनाला टक्कर देण्यात भारतीय कोरोना लस कोवॅक्सिन सक्षण असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus

पुढील बातम्या