मुंबई, 30 मार्च : अमुक एका दुर्मिळ आजारानं ग्रस्त असलेल्या बालकाच्या उपचारांसाठी परदेशातून महागडी औषधं मागवण्यात आली, अशा कितीतरी बातम्या आपल्याला बघायला किंवा वाचायला मिळतात. दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठी परदेशातून महागडी औषधं मागवण्याची प्रक्रिया कमालीची खर्चिक असते. त्यामुळे अनेकांना गरज असूनही योग्य उपचार मिळत नाहीत.
याच कारणामुळे दुर्मिळ आजारांच्या उपचारांत वापरल्या जाणार्या औषधांना सीमा शुल्कातून (कस्टम ड्युटी) सवलत दिली जावी, अशी अनेक निवेदनं सरकारला मिळत आहेत. याचा गांभीर्यानं विचार करून सरकारनं दुर्मिळ आजारांच्या उपचारांदरम्यान वैयक्तिक वापरासाठी आयात करण्यात येणारी औषधं आणि खाद्यपदार्थांना मूलभूत सीमा शुल्कातून पूर्णपणे सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. 'हिंदुस्थान टाइम्स'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पुरुषांपेक्षा स्त्रिया जगतात जास्त आणि कमी प्रमाणात पडतात आजारी, असे का? हार्वर्डने शोधलं उत्तर
केंद्रीय अर्थ मंत्रालयानं गुरुवारी या संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत केंद्रीय अर्थ मंत्रालयानं सांगितलं की, औषधांच्या वैयक्तिक आयातदारांना सूट मिळविण्यासाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या अधिकार्यांच्या सहीची प्रमाणपत्रे सादर करणं गरजेचं आहे. वैयक्तिक स्वरुपात परदेशातून आयत केलेल्या औषधांसाठी सामान्यतः 10 टक्के मूलभूत सीमा शुल्क आकारलं जातं. जीवरक्षक औषधं आणि लसींच्या काही श्रेणींवर पाच टक्के शुल्क आकारलं जातं किंवा पूर्णपणे सवलत दिली जाते.
या पूर्वी, फक्त स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफीच्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या औषधांवरील सीमाशुल्कात सूट देण्यात आली होती. त्यामुळे इतर दुर्मिळ आजारांच्या उपचारांत वापरल्या जाणार्या औषधांसाठीदेखील सीमाशुल्क सवलत देण्यात यावी यासाठी सरकारला निवेदनं मिळत होती. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनीदेखील नुकतंच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना या संदर्भात एक पत्र लिहिलं होतं. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी निहारिका नावाच्या मुलीच्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या कर्करोगावरील औषधांवर सात लाख रुपयांचा जीएसटी माफ करण्याची विनंती केली होती.
त्यानंतर जारी करण्यात आलेल्या अर्थमंत्रालयाच्या अधिसूचनेत सांगण्यात आलं आहे की, "दुर्मिळ आजारांवर उपचार करण्यासाठी लागणारी औषधं किंवा विशेष खाद्यपदार्थ महाग आहेत आणि ते परदेशातून आयात करावे लागतात. असा अंदाज आहे की, दुर्मिळ आजारांवर उपचार घेणाऱ्या 10 किलो वजनाच्या बालकासाठी वार्षिक 10 लाख रुपये ते 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येऊ शकतो. रुग्णाचं वय, उपचारांचा कालावधी, औषधांचा डोस, आणि वजनानुसार उपचारांचा खर्च वाढत जातो. या सवलतीमुळे रुग्णांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होईल आणि त्यांना दिलासा मिळेल."
तुम्ही इतके तास झोप घेत नसाल तर व्हा सावध, संपूर्ण शरीराच्या धमन्या होऊ शकतात ब्लॉक
कॅन्सरच्या उपचारात वापरलं जाणारं पेम्ब्रोलिझुमॅब हे औषध मूलभूत सीमा शुल्कातून पूर्णपणे सूट मिळालेल्या औषधांपैकी एक आहे.
Rare Diseases, Custom Duty, Drugs
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle