उच्च रक्तदाबावर नियंत्रणासाठी फायदेशीर ओव्याचे पाणी

उच्च रक्तदाबावर नियंत्रणासाठी फायदेशीर ओव्याचे पाणी

ओव्याच्या पाण्यामुळे उच्च रक्तदाब तर नियंत्रणात राहतोच पण कोलेस्ट्रॉलही कमी होते.

  • Last Updated: Jul 28, 2020 10:42 PM IST
  • Share this:

अयोग्य जीवनशैली आणि खाण्याच्या अनियमित वेळा यामुळे अधिकतर लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतोशारीरिक व्यायामाचा अभाव आणि चरबीयुक्त खाणे यामुळे रक्तप्रवाह प्रभावित होतोअनेकदा हार्ट ब्लॉकेज तर होतातच पण शरीरातील अन्य भागातही सूक्ष्म ब्लॉकेज निर्माण होतात त्यामुळे रक्तदाब वाढतोऔषधांसोबत घरगुती उपाय आणि व्यायामाने त्यापासून सुटका होऊ शकतेअसाच एक घरगुती उपाय म्हणजे ओव्याचे पाणी. ओव्याचे पाणी हृदयाच्या रोग्यांसाठी खूप उपयुक्त आहेत्याने उच्च रक्तदाब तर नियंत्रणात राहतोच पण कोलेस्ट्रॉलही कमी होते.

असे तयार करा ओव्याचे पाणी

एक कप पाण्यात ओवा रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी ओव्यासह 20 मिनिटं चांगलं उकळात्यात हवे तर चवीसाठी लिंबू पिळा आणि प्याअसे पाणी रोज सकाळी सकाळी प्यायल्याने फायदा होतो.

ओवा पचन सुधारतं

myupchar.com चे डॉलक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलंओवा उष्ण प्रवृत्तीचा असतो. त्याने शरीरात उष्णता निर्माण होते आणि पचन ठीक होतेज्यांना अजीर्णवातबद्धकोष्ठतापित्ताचा त्रास असतो त्यांच्यासाठी ओव्याचे पाणी रामबाण उपाय आहेओवा लहान आणि मोठ्या आतड्यांसाठी फायदेशीर आहे.

हृदयाचे आजार असलेल्यांसाठी फायद्याचे

उच्च रक्तदाब आणि हृदय रोग हा कोलेस्ट्रॉल वाढल्याने होतोशरीरातील कोलेस्ट्रॉल अनियमित दिनचर्या आणि चरबीयुक्त खाण्याने वाढतेत्याने रक्त घट्ट होतेत्याचा परिणाम हृदय आणि रक्ताभिसरण करणाऱ्या स्नायूंवर ताण वाढतोmyupchar.com चे डॉलक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितल, अशा परिस्थितीत ओव्याचे पाणी फायद्याचे आहेओवा उष्ण असल्यानेस्नायूंमध्ये उष्णता वाढते आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो.

ओव्याचा चहाही लाभदायक

ओव्याच्या चहाचं सेवन हृदयाला चांगले असतेओव्याच्या पाण्यात थोडा ग्रीन टी आणि लिंबू पिळून चहा तयार करता येतोत्याने लठ्ठपणा कमी होतोकारण ओव्यामध्ये अँटि-ऑक्सिडंटचे गुण आहेतम्हणून ते हृदय रोग्यांसाठी फायद्याचे आहेओव्यामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड खूप प्रमाणात आहेते हृदय आणि मेंदू यांच्या स्वास्थ्यासाठी उत्तम आहेशरीरातील घातक कोलेस्ट्रॉलचे प्रमाणसुद्धा ओव्याच्या सेवनामुळे कमी होते. ओवा मेंदूला आवश्यक पोषण देतो. त्यात असणारे तंतुमय पदार्थ हृदय रुग्णांसाठी फायद्याचे असतात.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - उच्च रक्तदाब

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: July 28, 2020, 10:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading