साखरेचा आणि दुधाचा चहा प्यायचा सल्ला का देतायत सेलेब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर?

साखरेचा आणि दुधाचा चहा प्यायचा सल्ला का देतायत सेलेब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर?

ऋजुता दिवेकर या सेलिब्रिटी न्यूट्रीशनिस्ट म्हणून ओळखल्या जातात.

  • Share this:

मुंबई, 31 जुलै : पावसाळा सुरु झाला की हमखास तल्लफ येते ती चहाची. एरवी नकोसा वाटणारा चहा पावसाच्या दिवसांत मात्र सर्वांनाच प्रिय असतो. बाहेर रिमझिमणारा पाऊस आणि हातात वाफाळता चहाचा कप हे पावसातलं कॉम्बिनेशन मन सुखावून टाकतं. मात्र अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी लोकांना कोणता चहा प्यावा आणि कोणता पिऊ नये किंवा मग तो साखरेचा असावा की बिनसाखरेचा असे अनेक प्रश्न पडलेले असतात. पण तुमच्या या सगळ्या प्रश्नाची उत्तरं सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून दिली आहेत.

ऋजुता यांनी नुकत्याच त्यांच्या एका पोस्टमधून पावसाळ्यात चहा पिण्याच्या हेल्थ टीप्स दिल्या आहेत.  त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, पावसाळा सुरू झाला आहे आणि खिडकीत बसून पाऊसाकडे बघत चहाचे घोट घेणं मनाला आनंद देणारं असतं, पण या दिवसात चहा बनवण्यासाठी 3 सोप्या टीप्स. ज्या तुमच्या आरोग्य चांगलं राहील.

Kidney stone मुतखड्याचा त्रास असेल तर 'हे' 6 पदार्थ खाणं आजच कमी करा

 

View this post on Instagram

 

Chai in monsoon - 3 special tips The rains are here and so is the desire to sit by the window, sipping a hot cup of chai. It surely calms your mind, but here are 3 easy tips to make it works for your body too. 1. Add ginger and tulsi - for digestion and immunity 2. Add lemon grass - to prevent bloating and congestion 3. Add black pepper or cinnamon - to improve insulin sensitivity FAQs on Chai - 1. When not to have chai/coffee? - first thing on waking up - last thing before sleeping - in place of a meal during the day 2. How many cups a day? 2-3 cups are totally fine. 3. With sugar or sugarfree? Add sugar to your chai/coffee, avoid the invisible sugar from packaged food (breakfast cereals, fruit juice, biscuits, etc). And have it in full fat milk please. #chailove #masalachai #mumbairains #monsoon

A post shared by Rujuta Diwekar (@rujuta.diwekar) on

1. चहामध्ये आलं आणि तुलसीचा वापर करा. यामुळे तुमची अन्नपचनाची प्रक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

2. पावसाच्या दिवसात चहा बनवत असताना त्यात गवती चहाचा वापर करा. यामुळे हाता-पायात गोळे येणे किंवा रक्तसंचय होणे या सारख्या समस्या कमी होतील.

3.चहामध्ये काळी मिरी आणि दालचिनीचा वापर करा. यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिनची पातळी समतोल राहते.

यासोबतच न्यूट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी कोणता चहा प्यावा, त्यात साखरेचं प्रमाण किती असावं. त्याचप्रमाणे तो दिवसातून कितीवेळा प्यावा या प्रश्नांची उत्तरंही त्यांच्या पोस्टमध्येदिली आहेत.

Skin care ची ही नवी थेरपी पाहून पडाल 'चाट'

प्रश्न : चहा किंवा कॉफी कधी पिऊ नये?

उत्तर : - सकाळी उठल्या उठल्या चहा पिऊ नये.

- झोपण्यापूर्वी चहा पिणं टाळावं.

- दिवसभरात जेवणाच्या वेळेत चहा पिऊ नये.

प्रश्न : दिवसातून किती कप चहा प्यावा?

उत्तर : दिवसभरातून 2-3 कप चहा प्यायला हरकत नाही.

प्रश्न : साखरेचा चहा की बिनसाखरेचा?

उत्तर : तुम्ही चहा-कॉफीमध्ये साखर घेत असाल तर मग साखरयुक्त पॅकेज फूड घेणं टाळा. ( जसे, फळांचे ज्यूस, बिस्किट्स इत्यादी)

डोळ्यांखाली काळी वर्तुळ येतायत, मग करा 'हे' घरगुती उपाय

ऋजुता दिवेकर या सेलिब्रिटी न्यूट्रीशनिस्ट म्हणून ओळखल्या जातात. त्या अभिनेत्री करिना कपूर आणि रोहित शेट्टी यांच्याही न्यूट्रीशनिस्ट आहेत. याशिवाय त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्या हेल्थसाठी उपयुक्त टीप्स सर्वांशी शेअर करत असतात.

=============================================================================

कोसळणारा पाऊस आणि पूर, अशा परिस्थितीत 6 महिन्याच्या तान्हुल्याला तरुणाने वाचवलं, VIDEO व्हायरल

Published by: Megha Jethe
First published: July 31, 2019, 8:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading