मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /फादर प्रार्थनेत होते मग्न; मांजरीने केलं असं खोडकर कृत्य की तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू VIRAL VIDEO

फादर प्रार्थनेत होते मग्न; मांजरीने केलं असं खोडकर कृत्य की तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू VIRAL VIDEO

प्राण्यांचे Cute Video सोशल मिडियावर पाहून चेहऱ्यावर हसू उमटल्याशिवाय राहत नाही. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

प्राण्यांचे Cute Video सोशल मिडियावर पाहून चेहऱ्यावर हसू उमटल्याशिवाय राहत नाही. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

प्राण्यांचे Cute Video सोशल मिडियावर पाहून चेहऱ्यावर हसू उमटल्याशिवाय राहत नाही. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

लंडन, 24 फेब्रुवारी : सोशल मीडियावर प्राण्या-पक्ष्यांचे अनोखे व्हिडिओज (animal videos on social media) कायमच क्षणात व्हायरल होतात. आता व्हायरल झालेला असाच एक व्हिडीओ (viral video) खूपच गंमतीशीर आहे. हा एका क्युट आणि खोडकर मांजरीचा (cute and naughty cat) व्हिडिओ आहे.

पूर्वी मांजर दुधावर डल्ला मारायची. आता मात्र मांजरींना जणू काही बरंच काय-काय आवडायला लागलं आहे. उदाहरणार्थ पॅनकेक (pancakes). ब्रिटनमध्ये एक कॅथेड्रल (Cathedral at Britain) आहे. कॅन्टरबरी कॅथेड्रल. इथल्या मांजरी आपल्या मजेशीर वागण्यानं सोशल मीडियावर एकदम स्टार बनल्या आहेत.

कॅन्टरबरी कॅथेड्रल (Canterbury Cathedral) मागच्या वर्षी कोरोनाव्हायरसची साथ (coronavirus pandemic) आल्यानंतर आपल्या प्रार्थनेचं प्रसारण ऑनलाईन (online prayers) करतं आहे. यासगळ्यात मांजरींनी अनेकदा ऑनलाईन प्रार्थनांमध्ये वेळोवेळी चांगलाच व्यत्यय आणलेला आहे.

आताही एका टायगर नावाच्या मांजरीनं (cat named tiger) सकाळच्या प्रार्थनेदरम्यान डीन रॉबर्ट विलीस यांच्या प्लेटमधून चक्क पॅनकेक्स चोरलेत (stole the pancakes). मागच्या वर्षी टायगर डिनच्या ग्लासातील दूध चोरून पिताना पकडली गेली होती. आता पॅनकेक्सचाही व्हिडिओ आला आहे.

इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केलेल्या या मजेशीर क्लिपमध्ये टायगर ही मांजर डीनच्या जवळ ठेवलेल्या पॅनकेक्सवर एकटक नजर रोखून बसलेली दिसते. कॅन्टरबरी कॅथेड्रलनंच याबाबतचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी लिहिलं आहे, 'आता हे प्रकरण दुधाच्याही पुढं गेलं आहे. आज सकाळच्या प्रार्थनेदरम्यान खोडकर टायगरनं डीन रॉबर्टच्या पॅनकेक्सवर निशाना साधला.'

हेही वाचा हरणाच्या एका उडीत 'जंगल का राजा'ही गार; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल!

हा व्हिडिओ पोस्ट केल्यावर काही काळातच चांगलाच व्हायरल झाला. अनेक युजर्सनी यावर मजेशीर कमेंट्सही केल्या. एकानं लिहिलं, 'हे पाहून माझी सकाळ आनंदात गेली.'

First published:

Tags: Canterbury cathedral, Cat, Father, Funny video, Instagram, International, London, Viral video.