मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मुक्या जीवामुळे महिलेला पुनर्जन्म! झोपेतच आला होता Heart attack; मांजरीने असा वाचवला तिचा जीव

मुक्या जीवामुळे महिलेला पुनर्जन्म! झोपेतच आला होता Heart attack; मांजरीने असा वाचवला तिचा जीव

हार्ट अटॅक आलेल्या मालकिणीला मांजरीने वाचवलं. (फोटो सौजन्य - Tom Maddick SWNS)

हार्ट अटॅक आलेल्या मालकिणीला मांजरीने वाचवलं. (फोटो सौजन्य - Tom Maddick SWNS)

हार्ट अटॅक आलेल्या महिलेला मांजरीने मृत्यूच्या दारातून खेचून काढलं.

  • Published by:  Priya Lad
लंडन, 19 ऑगस्ट : हार्ट अटॅक आल्याने एखाद्याचा जागच्या जागीच किंवा वेळेत उपचार न मिळाल्याने काही तासात त्याचा मृत्यू होतो.  एखाद्याला हार्ट अटॅक आल्यानंतर नेमकं काय करावं हे बऱ्याचदा आपल्या माणसांनाही सूचत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका मांजरीने हार्ट अटॅक आलेल्या महिलेचा जीव वाचवला आहे. महिलेला झोपेतच हार्ट अटॅक आला होता पण मांजरीमुळे ती आज जिवंत आहे. प्राण्यांचा जीव जसे माणसे वाचवतात तसा काही मुक्या जीवांनाही माणसांचा जीव वाचवल्याची प्रकरणं आहेत. त्यापैकीच ही एक मांजर. जी आपल्या मालकिणीच्या शेजारीच झोपली होती. त्यावेळी झोपेत तिच्या मालकिणीला हार्ट अटॅक आला. ती मृत्यूच्या दारातच गेली होती. पण मांजरीने तिला मृत्यूच्या दारातून खेचून परत आणलं. सॅम फेलस्टे नावाच्या या महिलेने आपल्या हिरो कॅटबाबत सोशल मीडियावर सर्वांना सांगितलं आहे. आपला जीव वाचण्याचं, आपण जिवंत असण्याचं क्रेडिट तिने आपल्या मांजरीला दिलं आहे. हे वाचा - बापरे! आता मासे-खेकड्यांनाही कोरोना? कोव्हिड टेस्टचा VIDEO आला समोर 42 वर्षांच्या सॅमने सांगितल्यानुसार, तिची मांजर सामान्यपणे तिच्या आईसोबत असते. पण त्या रात्री ती सॅमसोबत राहिली. एरवी मांजर शांत असतं. पण त्या रात्री ती तिला झोपेतून सतत उठवण्याचा प्रयत्न करत होती. सॅम म्हणाली, "मांजर मला उठवण्याचा प्रयत्न करत आहे असं जाणवलं. मला उठायचं होतं पण उठताच येत नव्हतं. मी हलूसुद्धा शकत नव्हते. त्यानंतर छातीच्या उजव्या बाजूला तीव्र वेदना झाल्या. मी माझ्या आईला मदतीसाठी हाक मारली" तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. BirminghamLive च्या रिपोर्टमुसार सॅमला हार्ट अटॅक आला होता. उपचारानंतर ती बोलू शकली. हे वाचा - धोका वाढला! पहिल्यांदाच माणसामुळे श्वानाला मंकीपॉक्सची लागण; WHO ने केलं अलर्ट रात्री तिला झोपेत हार्ट अटॅक आला त्यावेळी तिच्या मांजरीने तिला सीपीआर दिला. मांजरीने तिच्या पंज्याने सॅमच्या छातीवर दाब दिला. काही वेळाने सॅम श्वास घेऊ लागली. "कुणी विश्वास ठेवा वा न ठेवो पण मांजरामुळे मी आज जिवंत आहे हे मला माहिती आहे", असं सॅम म्हणाली.
First published:

Tags: Cat, Health, Heart Attack, Lifestyle, Pet animal

पुढील बातम्या