सावधान! मांजर पाळणाऱ्यांना शास्त्रज्ञांकडून धोक्याचा इशारा

सावधान! मांजर पाळणाऱ्यांना शास्त्रज्ञांकडून धोक्याचा इशारा

हा परजीवी मांजरांच्या शरीरात गेल्यास त्यांना टॅक्सोप्लास्मोसिस नावाचा आजार होतो. महत्त्वाचं म्हणजे हा आजार त्यांना पक्षी, कुरतडणारे प्राणी खाल्ल्याने होतो. त्यामुळे मांजरांच्या मालकांनी सावध राहण्याची गरज आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 जानेवारी : कोरोनाच्या (Corona) या संकटानंतर भारतात सध्या बर्ड फ्लू (Bird Flu) मोठ्या प्रमाणात पसरतो आहे. या आजाराने अनेक मुक्या पक्ष्यांचा जीव गेला आहे. संशोधनात मांजरांविषयी देखील नवीन माहिती समोर आली आहे. या संशोधनात मांजरापासून (Cats) पसरणाऱ्या परजीवीमुळे (Parasites) माणसाला (humans) कॅन्सर (Cancer) होऊ शकतो असं म्हटलं आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा परजीवी (Infection) मांजराच्या मांसातून पसरतो. माणूस मांजराचे मांस खात नसला, तरीदेखील सावधान राहण्याची गरज आहे. याचबरोबर ज्या व्यक्तींनी मांजर पाळले आहे त्यांना देखील सावध राहण्याची गरज आहे.

टी गोंडी (T Gondii) नावाच्या या परजीवीविषयी मागील काही वर्षांपासून संशोधक संशोधन करत होते. टी गोंडी हा जिवाणू नाही की विषाणू नाही. तो परजीवी जीव आहे. ज्याला सोप्या मराठीत बांडगूळ म्हणतात. हा जीव दुसऱ्या जीवांच्या शरीरातील पोषक द्रव्य शोषून स्वत:चं अन्न मिळवतो. परंतु या परजीवीचा मेंदूच्या (Brain) आजाराशी याचा काही संबंध आहे की नाही याचा तपास लागत नव्हता. आता या नवीन संशोधनात नवीन माहिती मिळाली असून याचा मानसिक आजाराशी संबंध असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

हा परजीवी मलेरिया पसरवणाऱ्या परजीवीच्या कुटुंबातील असून अतिशय सूक्ष्म आहे. हा परजीवी मांजरांच्या शरीरात गेल्यास त्यांना टॅक्सोप्लास्मोसिस नावाचा आजार होतो. महत्त्वाचं म्हणजे हा आजार त्यांना पक्षी, कुरतडणारे प्राणी खाल्ल्याने होतो. त्यामुळे मांजरांच्या मालकांनी सावध राहण्याची गरज आहे.

(वाचा - 20 महिन्यांची चिमुकली जग सोडून जाण्याआधी वाचवून गेली 5 लोकांचा जीव)

या पद्धतीने मांजरांमध्ये होतो फैलाव -

संशोधनानुसार, अमेरिकेत या आजाराने 40 टक्के मांजरे संक्रमित झाली आहेत. हा आजार खूप घातक असून मांजराच्या लिव्हर आणि नर्व्हस सिस्टीममध्ये गेला, तर त्याला कावीळ किंवा आंधळेपणा येऊ शकतो. या आजाराची लागण झाल्यानंतर मांजरांच्या विष्ठेतून मोठ्या प्रमाणात हे परजीवी बाहेर पडतात. यामुळे घरातील व्यक्तींना देखील होऊ शकतो. हा परजीवी पाण्यामध्ये आणि मातीमध्ये 1 वर्ष जिवंत राहत असल्याने मानवाला याचा मोठा धोका आहे.

या देशांमध्ये सर्वाधिक व्यक्ती संक्रमित -

टी गोंडी (T Gondii) या परजीवीचं संक्रमण कच्चे मांस खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात होतं. युरोप आणि अमेरिकेमध्ये याचं संक्रमण होण्याचं प्रमाण जास्त आहे. काही भागांमध्ये याचं 90 टक्क्यांहून अधिक संक्रमण आहे. अमेरिकेत 11 टक्के नागरिक हे गोंडी या आजाराने संक्रमित आहेत. उत्तम शारीरिक स्वास्थ्य असणाऱ्या व्यक्तींमध्ये अनेकदा या आजाराच्या संक्रमणाची लक्षणं दिसून येत नाहीत. परंतु प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये धोका निर्माण होऊ शकतो.

या आजारावर अद्याप कोणतंही औषधं उपलब्ध नसून काळजी घेण्याची गरज आहे. या आजाराला मानसिक आजाराशी जोडलं जात आहे. कुरतडणारे प्राणी मांजराच्या मूत्राचा वास घेऊ शकत नसल्याने त्यांचे शिकार होतात. यामुळे मांजरांमध्ये हा आजार पसरतो. टी गोंडी माणसाच्या मेंदूमध्ये गाठ तयार करून, मेंदूचे कार्य बदलतो. यामुळे मानवाच्या मानसिक विकासावर याचा परिणाम होतो. मेंदूमध्ये असणाऱ्या डोपामाइनची पातळी देखील वाढते.

मेंदूमध्ये गाठी तयार होतात -

या गाठींमुळे (Cysts) मानवाच्या मेंदूमध्ये जळजळ, डिमेन्शिया आणि साइकोसिस सारखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. साधारणपणे गाठींमुळे (Cysts) कोणतंही नुकसान होत नाही. परंतु या आजाराचं संक्रमण झाल्याने स्किट्जोफ्रीनिया, ऑटिज्म आणि अल्झायमर यांसारख्या आजारांना देखील आमंत्रण मिळू शकतं. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. या आजाराची लक्षण ओळखण्यासाठी अजूनपर्यंत कोणतेही मापदंड नाहीत. परंतु अनेक प्रकरणांमध्ये स्क्रिझोफ्रेनिया आणि विविध लक्षणं आढळून आली आहेत. या आजारामुळे मानसिक आजार वाढण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली असून मानसिक प्रभाव मोठ्या प्रमाणात होणार असल्याचं संशोधक म्हणत आहेत.

Published by: Karishma Bhurke
First published: January 14, 2021, 1:00 PM IST
Tags: cat

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading