नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : काजूमध्ये (Cashew ) व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॉपर, झिंक, लोह, मँगनीज आणि सेलेनियम यांसारखे पोषक घटक आढळतात. यामुळे काजू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळेच हिवाळा सुरू होताच ऊर्जा आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लोक काजू खाण्यास सुरुवात करतात. काही लोक असे असतात जे दररोज मर्यादित प्रमाणात काजू खातात. तर काही लोक दिवसभरात केव्हाही कितीही प्रमाणात (Cashew Or Kaju Side Effects) काजू खातात.
काजू खाणे आरोग्यासाठी चांगले असले तरी, काही जणांना त्याचा त्रासही होऊ शकतो. काजू खाणे आरोग्यासाठी कसे हानिकारक ठरू शकते याबाबत जाणून घेऊया.
पोटाच्या समस्यांमध्ये
जर तुमचे पोट वारंवार खराब होत असेल किंवा तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असतील. तर काजूचे सेवन करू नये. यामुळे तुमची समस्या आणखी वाढू शकते आणि तुम्हाला लूज मोशन, गॅस, अपचन यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
वजन वाढू शकते
तुमचे वजन जास्त असेल किंवा तुम्हाला वजन कमी करायचे असेल. तर काजूचे सेवन करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. वास्तविक, काजूमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे तुमचे वजन आणखी वाढू शकते.
अॅलर्जी असू शकते
काही जणांना काजू खाल्ल्याने अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला उलट्या, खाज सुटणे, लूज मोशन आणि पुरळ उठणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
हे वाचा - Side Effects Of Lipstick : तुम्हीही नेहमी लिपस्टिक लावता का? ओठांवर होतात हे गंभीर परिणाम
डोकेदुखी वाढू शकते
काजू खाल्ल्याने काही जणांना डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. खरं तर, काजूमध्ये टायरामाइन आणि फेनिलेथिलामाइन अमीनो अॅसिड असतात, ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल किंवा तुम्ही मायग्रेनच्या समस्येने त्रस्त असाल. त्यामुळे काजू खाणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
हे वाचा - Cancer : कॅन्सरमुळे अंगावरील तीळाचा असा बदलतो रंग, तज्ज्ञांनी दिली ही महत्त्वाची माहिती
हॉटफ्लॅश
तुमची रजोनिवृत्ती (मेनोपॉज) सुरू असताना तुम्ही काजूचे सेवन टाळावे. काजूचा गुणधर्म हा गरम असतो, त्यामुळे हॉटफ्लॅशची समस्या उद्भवू शकते. यामुळे तुम्हाला त्या काळात घाबरणे आणि अस्वस्थ वाटू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips