गाजर खा आणि निरोगी रहा!

गाजर खा आणि निरोगी रहा!

वय वाढतं, तशी शक्ती कमी होते. ती टिकून राहण्यासाठी नियमित गाजर खाल्लं पाहिजे. गाजरानं कमकुवतपणा संपतो. शिवाय डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर उपयोगी असतं.

  • Share this:

14 डिसेंबर : वय वाढतं, तशी शक्ती कमी होते. ती टिकून राहण्यासाठी नियमित गाजर खाल्लं पाहिजे. गाजरानं कमकुवतपणा संपतो. शिवाय डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर उपयोगी असतं.

काय आहेत गाजराचे फायदे?

1. गाजरानं पचनशक्ती सुधारते. गाजरात बिटा कॅरोटिन असतं. ते कॅन्सरला प्रतिबंधक ठरतं.

2. गाजर कच्चं खावं. त्यानं जास्त फायदा होतो.

3. गाजरापेक्षा गाजराच्या पानांमध्ये लोह असतं. त्यानं अॅनिमिया दूर होतो.

4. थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात उब राहते.

5. गाजराचा रस आणि मध एकत्र करून प्यायल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

6. गाजरांच्या पानांची भाजी बनते. ती बनल्यावर उरलेलं पाणी पाऊन घ्या. त्यात पोषकद्रव्य असतात.

7. पालक आणि गाजराचा रस एकत्र करून प्यायल्यास तब्येत सुधारते.

8. गाजरात ए व्हिटॅमिन असतं. चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते.

9. गाजरात कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी, बी असतं. त्यानं हृदयरोगावरही मात करता येते.

First published: December 14, 2017, 5:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading