केसांमधील उवांमुळे हैराण झाला आहात? घरच्या घरी तयार करा हे रामबाण औषध

केसांमधील उवांमुळे हैराण झाला आहात? घरच्या घरी तयार करा हे रामबाण औषध

उवांसाठी केमिकलयुक्त औषध वापरून केसांना हानी पोहोचवण्यापेक्षा हा घरगुती उपाय करून पाहा.

  • Last Updated: Dec 11, 2020 10:58 PM IST
  • Share this:

केसांची स्वच्छता व्यवस्थित ठेवली नाही तर उवा होण्याचा त्रास सहन करावा लागतो. जर त्यांना वेळीच काढलं नाही तर त्या वाढतात आणि डोक्यात खाज यायला सुरुवात होते. यासाठी घरगुती उपाय उत्तम आहेत. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं उवा या परजीवी आहेत, त्या डोक्यात राहून माणसाचे रक्त पितात. उवांचा इलाज केला नाही तर त्यांच्या संक्रमणाने डोक्यावरचे केसही जातात.

ओव्यापासून असे तयार करा औषध

डोक्यातील उवा जाण्यासाठी घरीच ओव्यापासून औषध तयार करता येतं. त्यासाठी 10 ग्रॅम ओवा घ्या त्याचे चूर्ण करा त्यात 5 ग्रॅम तुरटी घाला. नंतर हे मिश्रण दही किंवा ताकात कालवून केसांना लावा आणि चांगली मालिश करा. याने उवा आणि लिखा मरून जातात.

ओव्याचे याशिवाय इतर बरेच फायदे आहेत ते कोणते पाहुयात

खोकला आणि कफपासून आराम

10 ग्रॅम ओवा गरम पाण्यात किंवा गरम दुधात दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्याने खोकला आणि कफ जातो. विशेषतः कोरड्या खोकल्याची समस्या याने लवकर दूर होते. डोकेदुखी देखील बरी होते.

पोटदुखीच्या निवारणासाठी परिणामकारक

पोटदुखीची समस्या असेल तर किंवा उलटीची समस्या असेल तर या सर्व रोगांच्या निवारणासाठी ओवा लाभदायक आहेत. ओव्याचे चिमूटभर चूर्ण खाल्ल्यानं बद्धकोष्ठता दूर होते, पित्त आणि अपचनाच्या समस्याही दूर होतात.

किडे चावले तर असा करा उपयोग

पावसाळ्याच्या दिवसात नेहमी काही किडे वाढतात. त्यात विंचू, गांधील माश्या, मधमाश्या यांनी जर चावा घेतला तर खूप वेदना होतात. त्यासाठी ओवांच्या पानांना चुरून किडे चावलेल्या जागेवर बांधले तर तात्काळ आराम मिळतो.

ओव्यामुळे दूर होते किडनी स्टोनची समस्या

किडनी स्टोनमुळे अनेक लोक त्रस्त असतात. त्यावर ओव्याचं सेवन फायद्याचं असतं. रोज ओव्याचं एक चमचा चूर्ण नियमितपणे खाल्लं तर स्टोन लवकर विरघळून जातात.

कान आणि दातांच्या वेदानांवरील उपाय

कानात खूप दुखत असेल तर ओव्याच्या तेलाचे काही थेंब टाकल्याने वेदना थांबतात. या शिवाय दातांच्या वेदनांसाठी एक चमचा ओवा आणि मीठ कोमट पाण्यात टाकून गुळण्या कराव्या त्याने दातातील वेदनांपासून आराम मिळतो.

पांढऱ्या केसांसाठी

केसांचं पांढरे होणं थांबवण्यासाठी ओवा, कढीपत्ता, मनुका आणि साखर यांचं मिश्रण करून काढा तयार करावा. रोज असा काढा प्यायल्याने केस पांढरे होत नाहीत.

मासिक पाळीत महिलांनी नियमित खावा ओवा

myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, ज्या महिलांची मासिक पाळी अनियमित आहे त्यांच्यासाठी ओवा हे उत्तम औषध आहे. ओवा नियमितपणे खाल्ल्याने मासिक पाळी नियमित होते, मासिक पाळीशी संबंधित समस्या ठिक होतात. याशिवाय रक्तस्त्रावही नियंत्रित होतो.

संधिवातात लाभदायक

ज्येष्ठ लोकांना संधिवाताचा त्रास होत असतो. अशा रुग्णांसाठी ओवा हे परिणामकारक औषध आहे. संधिवात असलेल्या लोकांनी सांध्यांवर ओवयाचा लेप लावल्याने त्यांना फायदा होतो. त्याने पेशीवरील सूज कमी होते आणि वेदनापण दूर होतात.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - ओवा फायदे, वापर आणि सहप्रभाव...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: December 11, 2020, 10:58 PM IST

ताज्या बातम्या