'या' शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी उपलब्ध आहेत नोकरीच्या भरपूर संधी

'या' शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी उपलब्ध आहेत नोकरीच्या भरपूर संधी

पर्यावरण शास्त्राच्या अभ्यासक्रमात जीव, भौतिक आणि रसायन शास्त्रातील घटक समाविष्ट आहेत

  • Share this:

मुंबई, 20 जून : अलीकडे पर्यावर या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. त्यामुळे पर्यावरण शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहे. हा बदल लक्षात घेऊन अने विद्यार्थी पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासाकडे वळत आहेत. इतर देशांप्रमाणेच भारतातसुद्धा या अभ्यासक्रमाला मोठी मागणी निर्माण झाली आहे.

पर्यावरण शास्त्राच्या अभ्यासक्रमात जीव, भौतिक आणि रसायन शास्त्रातील घटक समाविष्ट आहे. तसंच प्रदूषण आणि पर्यावरणाच्या नासाडीचा मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास या अभ्यासक्रमात शिकविला जातो. स्थानिक पातळीवलील जैवविविधता आणि त्यांचे उपयोग यावरही या शास्त्रात संशोधन केलं जातं. या शास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे, यात भौतिक, रसायन अशा केवळ विज्ञानाशी संबंधित शास्त्रांचा अभ्यास कराला लागतो असं नव्हे, तर कायदा, इतिहास, अर्थशास्त्र अशा सामाजिक शास्त्रांचाही या अभ्सासक्रमात समावेश आहे.

प्रत्येक कामात लपलेली असते भविष्यातली सुवर्णसंधी

पर्यावरण ही एक प्रक्रिया आहे आणि पर्यावरणाचे स्वरुप वरचेवर बदलत चालले आहे. या बदलाचा वेध घेण्यासाठी अनेक शास्त्रांच अभ्सा करावा लागतो आणि त्यामुळे पर्यावरण शास्त्राचा अभ्यासक्रम अनेकपदरी आणि गुंतागुंतीचा झालेला आहे. त्यामुळे सतत कराव्या लागणाऱ्या बदलाचा अभ्साच तु्ही घ्यायलाच हवा.

दहावी किंवा बारावीनंतर पर्यावण शास्त्राचाच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन त्यात पदवी प्राप्त करता येते. परंतू या पदवी अभ्यासक्रमामध्ये या शास्त्राची फार वरवरची माहिती मिळते. काही सखोल ज्ञान मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांना पदवीनंतर मान्यताप्राप्त संस्थांमध्ये जाऊन पदव्युत्तर पदवी घेता येते.

मुलींसाठी सर्वात जास्त संधी असलेली 'ही' आहेत 5 क्षेत्र

भरत सरकारच्यावतीनेसुद्धा सद्या पर्यावरण रक्षणावर नमोठा भर दिला जात आहे, त्यामुळे या अभ्यासक्रमांनासुद्धा सरकारी मदत मिळत असते. विविध स्वयंसेवी संघटना सरकारच्या मदतीन आणि वेळ पडल्यास परदेशातून आलेल्या निधीच्या आधारेसुद्धा पर्यावरणाविषयीचा अभ्यास करणारे अनेक प्रकल्प राबविले जात आहेत.

First published: June 20, 2019, 4:17 PM IST
Tags: career

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading