टेंशन जाईल पेंशन घ्यायला; जॉबच्या पहिल्या दिवसासाठी उपयुक्त आहेत 'या' टिप्स

टेंशन जाईल पेंशन घ्यायला; जॉबच्या पहिल्या दिवसासाठी उपयुक्त आहेत 'या' टिप्स

'फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन' हे एकच वाक्य डोक्यात असल्यामुळे कामात होऊ शकतात चुका

  • Share this:

मुंबई, 22 जून : जॉब लागल्यानंतर पहिल्या दिवशी सगळेच जण एका वेगळ्या टेंशनमध्ये असतात. 'फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन' हे डोक्यात असल्यामुळे ऑफिसमध्ये पहिल्या दिवशी कसं काम करायचं? आधीपासून काम करणाऱ्यांसोबत कसं जुळवून घ्यायचं? अशा अनेक गोष्टींचा विचार असल्यामुळे हे टेंशन येतं. अशात तुमच्याकडून कामात चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज आम्ही तु्म्हाला काही टिप्स देणार आहोत, ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या अजिबात चुका होणार नाहीत.

1 - पहिल्या दिवशी काम असो वा नसो पण घरी जायची अजिबात घाई करू नका. विशेष म्हणजे निघताना बॉसची परवानगी घेऊन निघा.

2 - पहिल्या दिवशी काहीच काम राहणार नाही असा विचार अजिबात करू नका. कामात रुची दाखवून वरिष्ठांना नेमकं काय काम करायचं आहे हे विचारा.

टक्केवारी कितीही मिळवा; यशस्वी होण्यासाठी 'ही' कौशल्ये तुमच्यात असायलाच हवी

3 - तुमच्या कलिग्सची ओळख करून घेताना मोजकंच बोला. जास्त वायफळ बोलू नका, नाहीतर पहिल्याच दिवशी ते दुरावले जातील.

4 - शक्यतो नवीन जॉईन झालेल्यांची सगळ्यांना ओळख करून दिली जाते. पण तशी ओळख झाली नसेल तर तुम्ही स्वतः जाऊन सगळ्यांची ओळख करून घ्या. यामुळे सुरुवातीला येणाऱ्या अडचणींसाठी तुम्ही त्यांना मदत मागू शकता.

5 - वक्तशीरपणा हवाच. जर तुम्ही पहिल्याच दिवशी ऑफीला उशीरा पोहोचलात तर तुम्ही लेटलतीफ आहात असा शिक्का तुमच्यावर लागू शकतो. वेळेच्या किमान 10 मिनिटं आधी ऑफिसला पोहोचा.

एखाद्याची पारख करताना लक्षात ठेवाय 'या' 5 गोष्टी

6 - जिन्स आणि टी-शर्ट न घालता पहिल्या दिवशी प्रोफेशनल कपडे घालून जा.

7 - ऑफिसची वेळ सकाळी असेल तर स्वतःला ब्रेकफास्ट सवय लावाच. कारण ही एकच सवय अशी आहे ज्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहू शकता.

8 - जॉबच्या पहिल्या दिवशी लवकर उठा. असं केल्याने किमान ऑफिच्या वेळेपर्यंत तुमची सगळी मरगळ निघून गेलेली असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2019 08:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading